क्रिकेट खेळता खेळता वाद विकोपाला; दगड अन् स्टम्पने फोडले डोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2023 10:35 PM2023-05-15T22:35:55+5:302023-05-15T22:36:46+5:30

Wardha News क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला जात हाणामारीत रूपांतरण झाले. याच हाणामारीत एकाने दुसऱ्यास दगड, तर दुसऱ्याने एकास स्टम्प मारून डोके फोडले. तर काहींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले.

Arguments broke out while playing cricket; Heads broken by stones and stumps |  क्रिकेट खेळता खेळता वाद विकोपाला; दगड अन् स्टम्पने फोडले डोके

 क्रिकेट खेळता खेळता वाद विकोपाला; दगड अन् स्टम्पने फोडले डोके

googlenewsNext

वर्धा : क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला जात हाणामारीत रूपांतरण झाले. याच हाणामारीत एकाने दुसऱ्यास दगड, तर दुसऱ्याने एकास स्टम्प मारून डोके फोडले. तर काहींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना आर्वी येथील कन्या शाळेच्या मैदानावर घडली.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; पण पोलिसांनी या परिसरात खडा पहारा दिल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून आर्वी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनीही तक्रारींवरून गुन्ह्याची नोंद घेतली आहे. जखमींवर आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एहतेशाम कुरेशी, रजा कुरेशी, अर्फत कुरेशी, बिलाल कुरेशी, सर्व रा. बालाजी वाॅर्ड आर्वी आणि खुशाल शंकर डिके, रोहन चावरे, सागर टाक, लकी परिवार यांच्यावर ३२४, ५०४, ३२३, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. सध्या या प्रकरणातील आरोपींचा शोध आर्वी पोलिस घेत आहेत.

खुशाल शंकर डिके व त्याचा मित्र सागर टाक, रोहन जावरे, लकी पालीवाल हे कन्या स्कूलच्या मैदानावर क्रिकेट खेळत होते. खुशाल हा बॅटिंग करीत असताना एहतेशाम कुरेशी हा बॉलिंग करीत होता. अशातच शिवीगाळ होत सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, एहतेशाम कुरेशी याने दगड हातात घेऊन खुशाल डिके याच्या डोक्यात हाणल्याने खुशालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर आरोपींनी खुशालच्या इतर मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे या प्रकरणातील एका पक्षाचे म्हणणे आहे. शिवाय तसे तक्रारीतही नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी शेख एहतेशाम शेख मजीद कुरेशी, रा. बालाजी वाॅर्ड यानेही आर्वी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीनुसार खुशाल डिके, रोहन चावरे, सागर टाक, लकी पालीवाल यांच्या विरोधात गुन्ह्याची नाेंद घेण्यात आली आहे. एहतेशाम व अरफाज रजा, बिलाल हे कन्या शाळेच्या मैदानावर खुशाल डिके, रोहन चावरे, सागर टाक आणि लकी पालीवाल यांच्यासोबत क्रिकेट खेळत होते. फिल्डिंग सुरू असताना खुशाल बॅटिंग करीत असताना त्याने शिवीगाळ करून भांडण सुरू केले. इतकेच नव्हे तर खुशाल याने स्टम्प हातात घेत अर्फात याच्या डोक्यावर मारून त्यास जखमी केले, तर खुशालच्या मित्रांनी अर्फात आणि रजा यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एसडीपीओंनी केली घटनास्थळाची पाहणी

घटनेची माहिती मिळताच आर्वीचे उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक पाटणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हर्षल नगरकर करीत आहेत.

 

Web Title: Arguments broke out while playing cricket; Heads broken by stones and stumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.