विद्यार्थिनींना त्रास देण्याºया रोडरोमिओंचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:55 PM2017-12-16T23:55:46+5:302017-12-16T23:56:32+5:30

शहरातील नाचणगाव मार्गावर अनेक शाळा, महाविद्यालये आहे. ग्रामीण भागातून शिकण्यासाठी मोठ्या संख्येने मुली पुलगाव शहरात येतात. या विद्यार्थिनींना बस किंवा खासगी वाहनाद्वारे प्रवास करावा लागतो.

Arrange Roadroms for harassing the girl students | विद्यार्थिनींना त्रास देण्याºया रोडरोमिओंचा बंदोबस्त करा

विद्यार्थिनींना त्रास देण्याºया रोडरोमिओंचा बंदोबस्त करा

Next
ठळक मुद्देप्रहार जनशक्तीची मागणी : मुलींच्या तक्रारीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : शहरातील नाचणगाव मार्गावर अनेक शाळा, महाविद्यालये आहे. ग्रामीण भागातून शिकण्यासाठी मोठ्या संख्येने मुली पुलगाव शहरात येतात. या विद्यार्थिनींना बस किंवा खासगी वाहनाद्वारे प्रवास करावा लागतो. बसच्या प्रतिक्षेत असणाºया विद्यार्थिनींना अनेकदा रोडरोमियोकडून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. पोलीस प्रशासनाचेया समस्येकडे लक्ष देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांना निवेदन देऊन केली आहे.
अनेकदा दुचाकी वाहनावरून येणाºया टवाळखोर मजनूकडून मुलींना मानसिक त्रास सहन करावा लागतो. असे प्रकार टाळण्याच्यादृष्टिने पोलीस प्रशासनाचे लक्ष देणे गरजेचे ठरत आहे. शहरातून नाचणगावकडे जाणाºया मार्गावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा तायल विद्यालय, ज्ञानभारती विद्यालय, आर.के. हायस्कूल, सेंट जॉन हायस्कूल, कला व विज्ञान महाविद्यालय आहे. तसेच गांधी सिटी पब्लिक स्कूल, विवेकानंद विद्यालय आणि शिकवणी वर्ग आहेत. त्यामुळे सकाळी व सायंकाळी विद्यार्थ्यांची वर्दळ असते. शिवाय शाळा सुटल्यानंतर किंवा शिकवणी वर्ग सुटल्यानंतर सायकलने ग्रामीण भागात किंवा घरी जाणाºया विद्यार्थिनींची रोडरोमियो पाठलाग करतात. चौकातही टवाळखोरांचा त्यांना त्रास सहन करावा लागतो. हीच परिस्थिती आदर्श हायस्कूल परिसरात दिसून येते.
यापूर्वी काही शाळांच्या प्रशासनाने नाचणगाव मार्ग व हरीराम नगर मार्गावर शाळा सुटण्याच्या व सुरू होण्याच्यावेळी पोलिसांनी सेवा द्यावी, अशी विनंती पत्राद्वारे केली होती. या अर्जानंतर काही दिवस येथे पोलिसांची गस्त होती. परंतु काही दिवसानंतर येथे पोलीस राहत नसल्याची संधी साधुन टवाळखोर मुलींना नाहक त्रास देतात. विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून प्रहार जनशक्ती पक्षाने सदर मागणीचे निवेदन दिले. निवेदन देताना तुषार वाघ, महेश साहू, तुषार काळे यांची उपस्थिती होती.

Web Title: Arrange Roadroms for harassing the girl students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.