बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:16 PM2018-03-25T22:16:16+5:302018-03-25T22:16:16+5:30

सेलू तालुक्यातील धपकी शिवारात शुभांगी पिलाजी उईके या १९ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. हा रेल्वेचा अपघात नसून तिच्यावर बळजबरी करून हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

Arrest the accused in the rape and murder case | बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा

बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा

Next
ठळक मुद्देबिरसा ब्रिगेडची मागणी : पोलीस अधीक्षकांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
वर्धा : सेलू तालुक्यातील धपकी शिवारात शुभांगी पिलाजी उईके या १९ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. हा रेल्वेचा अपघात नसून तिच्यावर बळजबरी करून हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. तिच्यावर बळजबरी करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करणारे निवेदन बिरसा बिरसा ब्रिगेडने पोलीस अधीक्षकांना सादर केले.
शुभांगी बलात्कार हत्याप्रकरणी बिरसा ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. अरविंद कुळमेथे, जिल्हा प्रमुख संदीप परतेती यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसह एल्गार केला. या आदिवासी मुलीवर काही नाराधमांनी सामूहिक बलात्कार करून हत्या केली. त्या मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळल्याने हा संशय बळावत आहे. असे असताना पोलीस प्रशासनाने कुठलीच ठोस दखल घेतलेली नाही. या प्रकरणात गांभिर्याने लक्ष घालून संबंधीत आरोपींना अटक करून शिक्षा देण्यात यावी. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बिरसा ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख संदीप परतेती यांच्यासह दादाराव उईके, नागेश तुमरे, बाळू मसराम, मनिष फुसाटे, भास्कर राऊत, सुरेश मडावी, समीर परतेकी, प्रवीण आत्राम, वृषभ कोयचाडे, सुरज आत्राम, सुशिल कोराते, तुषार कोराते, मनोहर कोराते, एकनाथ पेंदोरे, राजेंद्र कुथमेथे आदींनी दिला.

Web Title: Arrest the accused in the rape and murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.