दाभोळकर व पानसरे यांच्या मारेकºयांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:53 AM2017-08-21T01:53:46+5:302017-08-21T01:54:46+5:30

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज चार वर्षे पूर्ण झाली; पण मारेकरी, सुत्रधार यांना अटक झाली नाही.

Arrest Dabholkar and Pansare's killers | दाभोळकर व पानसरे यांच्या मारेकºयांना अटक करा

दाभोळकर व पानसरे यांच्या मारेकºयांना अटक करा

Next
ठळक मुद्दे‘जवाब दो’ आंदोलन : महाराष्ट्र अंनिसचे राम शिंदे यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज चार वर्षे पूर्ण झाली; पण मारेकरी, सुत्रधार यांना अटक झाली नाही. त्याचा विरोध व निषेध व्यक्त करण्यासाठी २० जुलै ते २० आॅगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून मंत्री राम शिंदे यांना निवेदन देत मारेकºयांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
सीबीआयने सनातन संस्थेचे साधक असलेले सारंग दिलीप आकोलकर व विनय बापूराव पवार यांच्यावर आरोपपत्र दाखल करून प्रतिज्ञापत्राद्वारे हे सनातनचे साधक आहे, असे लिहून दिले. त्याचप्रमाणे डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येलाही अडीच वर्षे झाली. त्यांच्याही हत्येत या सनातन संस्थेच्या आरोपींचा प्रत्यक्ष सहभाग तपासात दिसला म्हणून प्रत्येकी दहा लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करूनही तपासात प्रगती झाली नाही. सनातन संस्थेवर बंदी घातली नाही. याबाबत सभागृहात प्रश्न विचारावा, मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. चार वर्षांतही मारेकºयांना अटक होत नसल्याने यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह लागत आहे. यातील आरोपींना त्वरित अटक व्हावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, भिमसेन गोटे, अंकीत जाधव, विक्रम कुमरे, अमोल भगत, प्रतिक पाटील, प्रेम कांबळे, गौरव तामगाडगे, प्रतीक्षा पांडे, सलोनी बोंदरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Arrest Dabholkar and Pansare's killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.