दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना अटक करा
By admin | Published: July 24, 2016 12:17 AM2016-07-24T00:17:27+5:302016-07-24T00:17:27+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुणे येथे २० आॅगस्ट २०१३ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
महाराष्ट्र अंनिस : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे
वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुणे येथे २० आॅगस्ट २०१३ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तीन वर्षे होऊनही त्यांचे मारेकरी व त्यामागील सुत्रधार मोकाट आहे. ही लोकशाहीला लाजविणारी बाब आहे. यातील मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने केली. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.
डॉक्टरांच्या हत्येचा राग, संताप, द्वेष, वेदना मनात ठेवत विवेकाच्या मार्गाने चवळवळीचे कार्यकर्ते प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला महाराष्ट्रभर भावना व्यक्त करतात. ‘हिंसा के खिलाफ मानवता ही ओर’, हे अभियान २० जुलै ते २० आॅगस्टपर्यंत राबवित आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून बुधवारी सकाळी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ करण्यात आले. यानंतर डॉक्टरांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले, कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे, कार्यवाह नरेंद्र कांबळे, भरत कोकावार, भिमसेन गोटे, अजय मोहोड, सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नूतन माळवी, नंदकुमार वानखडे, डॉ. माधुरी झाडे, सुनील सावध, प्रा. सावरकर, प्रा. वानखडे, सुनील ढाले, किसान अधिकारचे मुख्य पे्ररक अविनाश काकडे, अ.भा. अंनिसचे संजय इंगळे तिगावकर, गुणवंत डकरे, अनिल मुर्डीव, राजेंद्र ढोबळे, सुधाकर मिसाळ, वानखडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)