अरूण जेटली यांनी त्चरित मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:46 PM2018-10-24T23:46:02+5:302018-10-24T23:46:42+5:30

पंजाब नॅशनल बॅक मधील हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी यांचे आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या कुटुंबियांचे लागेबांधे आहेत. आणि त्याला भारतातून पळून जायला अरूण जेटली यांनीच मदत केली.

Arun Jaitley resigns as Tertrish Minister | अरूण जेटली यांनी त्चरित मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा

अरूण जेटली यांनी त्चरित मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा

googlenewsNext
ठळक मुद्देयुवक काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पंजाब नॅशनल बॅक मधील हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी यांचे आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या कुटुंबियांचे लागेबांधे आहेत. आणि त्याला भारतातून पळून जायला अरूण जेटली यांनीच मदत केली. अर्थमंत्री अरूण जेटली यांची कन्या सोनाली व जावई जयेश यांच्या जेटली असोसिएट्स या कंपनीला मेहुल चोक्सीकडून २४ लाख रूपये मिळाले होते. ते त्यांच्या बँक खात्यात भरण्यात आल्याचे पुरावेही आहेत. जेटली यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. तसेच अरूण जेटली यांचा प्रतिकारात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विपीन राऊत, अमित चाफले, सचिन गुप्ता, उपाध्यक्ष विराज शिंदे, नकुल भाईमारे, देवळी विधानसभा अध्यक्ष निलेश ज्योत, विक्की ताडाम, कपील डोळे, निखीत नरसिंगकर, मिराण पटेल, आशीष मानकर, सलमान शेख, शुभम मांडवगडे, आदित्य रूद्रकार, पंकज पाके, अमित तिखे उपस्थित होते.

Web Title: Arun Jaitley resigns as Tertrish Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.