आर्वीचा अर्जून ठाकूर अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 10:15 PM2018-06-08T22:15:36+5:302018-06-08T22:15:36+5:30

शैक्षणिक जीवनात भविष्याची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहाव्या वर्गाचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या या निकालात आर्वी येथील कृषक विद्यालयाचा अर्जून प्रफुल्ल ठाकूर जिल्ह्यात अव्वल ठरला.

Arvi Arjun Thakur tops | आर्वीचा अर्जून ठाकूर अव्वल

आर्वीचा अर्जून ठाकूर अव्वल

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ८३.५४ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शैक्षणिक जीवनात भविष्याची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहाव्या वर्गाचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या या निकालात आर्वी येथील कृषक विद्यालयाचा अर्जून प्रफुल्ल ठाकूर जिल्ह्यात अव्वल ठरला. त्याने ९९.२० टक्के (४९६) गुण घेतले.
सुशील हिंमतसिंगका विद्यालयाचा क्षितीज गौतम भस्मे हा ९९ टक्के गुण घेवून दुसºया क्रमांकावर राहिला. त्याने ४९५ गुण घेतले. जिल्ह्यातून तिसरा येण्याचा मान आर्वी येथील विद्यानिकेतन इंग्लिश हायस्कूल शाळेच्या साक्षी हरिष वडाळकर हिने पटकाविला. तिने ९८.८० टक्के (४९४) गुण घेतले. शिवाय ती जिल्ह्यातून मुलींमधून पहिली ठरली. अग्रगामी हायस्कूल पिपरी (मेघे) येथील अनुजा साटोने ही ९७.६० टक्के गुण घेत जिल्ह्यात मुलींमधून दुसरी ठरली.
जिल्ह्यातील निकालात मुलींची टक्केवारी ८८.३१ एवढी आहे तर ७९.३७ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात यंदाच्या वर्षाला ८३.५४ टक्के निकाल लागला.
जिल्ह्यातील २७९ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांतून एकूण १७ हजार ८९१ मुलांनी परीक्षेचा अर्ज भरला. यात ९ हजार ३६६ मुले आणि ८ हजार ५२५ मुलींचा समावेश आहे. यातील १७ हजार ८०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्यांपैकी १४ हजार ९८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्यांत ७ हजार ३८५ मुले आणि ७ हजार ८०५ मुलींचा समावेश आहे.
एका शाळेचा निकाल शुन्य टक्के
जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालयाचा निकाल शुन्य टक्के लागला. तर भरत दिनांत विद्यालयाचा निकाल जिल्ह्यात सर्वात कमी राहिला. त्याची टक्केवारी १२.५० टक्के एवढी राहिली आहे.
 

Web Title: Arvi Arjun Thakur tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.