आर्वी उपसा सिंचन हे देशातील पहिले मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 05:00 AM2019-11-19T05:00:00+5:302019-11-19T05:00:30+5:30

गावात एखादा २०० कोटी खचून कारखाना उभा राहिल्यास आपल्याला आनंद होतो. परंतु, आपल्या अंगणातून गेलेल्या ३ हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पातून आपली भूूमी सुजलाम्-सुफलाम् होऊन आर्थिक उन्नती होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला देवळी, आर्वी, हिंगणघाट व वर्धा तालुक्यातील १०८ पाणी वापर संस्थांचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते.

Arvi Upsa Irrigation is the first model in the country | आर्वी उपसा सिंचन हे देशातील पहिले मॉडेल

आर्वी उपसा सिंचन हे देशातील पहिले मॉडेल

googlenewsNext
ठळक मुद्देअविनाश सुर्वे : निम्न वर्धा प्रकल्प पाणी वापर संस्थेची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : मागील पाच वर्षात विदर्भातील निम्न वर्धा व गोसेखुर्द प्रकल्पांनी प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या माध्यमातून भरारी घेतली आहे. देशातील व राज्यातील पहिला प्रयोग म्हणून जिल्ह्यातील आर्वी उपसा सिंचन योजनेत निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी घेऊन ६ हजार ४०० हेक्टर शेतजमिनीपर्यंत पाणी पोहोचविण्याचे मॉडेल उभे राहिले आहे, असे मत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी व्यक्त केले.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत निम्न वर्धा प्रशासन, मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्थेच्यावतीने निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत ‘पाणी व्यवस्थापन व सिंचन व्यवस्थापन’ या विषयावर जिल्ह्यातील पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची एक दिवशीय कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वर्ध्यातील मुडे सेलिब्रेशनमध्ये पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटक म्हणून सुर्वे बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पाटबंधारे मंहामंडळ नागपूरचे अधिक्षक अभियंता ज.ग.गवळी, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता जि.मो.शेख, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दि.ग.बारापत्रे, कार्यकारी अभियंता आर.पी.वऱ्हाडे तर मार्गदर्शक म्हणून अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण मुंबईचे सिनिअर फेलो श्रीकांत बाराहाते, भरत महोदय, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता वरभे व वन्यजीव तज्ज्ञ व संशोधक डॉ. मिलिंद वाटवे यांची उपस्थिती होती. पुढे सुर्वे म्हणाले, राज्यातील ३२५ लाख हेक्टर क्षेत्रात शेती केली जात असताना केवळ ३० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. गावात एखादा २०० कोटी खचून कारखाना उभा राहिल्यास आपल्याला आनंद होतो. परंतु, आपल्या अंगणातून गेलेल्या ३ हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पातून आपली भूूमी सुजलाम्-सुफलाम् होऊन आर्थिक उन्नती होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला देवळी, आर्वी, हिंगणघाट व वर्धा तालुक्यातील १०८ पाणी वापर संस्थांचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते. यावेळी राणी दुर्गावती व सावित्रीबाई फुले पाणी वापर संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राशीद पठाण व आभार प्रदर्शन सहाय्यक अभियंता सचीन गाडे यांनी केले. आयोजनाकरिता उपविभागीय अभियंता गजानन घुगल, संजय मानकर, अमोल चंदावार, एस. पी. पवार, डी. आर. जोशी व उपकार्यकारी अभियंता पूजा पत्तेवार यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शेतकऱ्यांसाठी कार्य करावे
निम्न वर्धा प्रकल्पाची सिंचन क्षमता ६३ हजार हेक्टर असून यापैकी हल्ली ४३ हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. घनमापन पद्धतीने पाणी वाटप केले जात आहे. खर्डा व पुलगाव बॅरेजचे काम प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यातील १०८ पाणी वाटप संस्थापैकी ८८ संस्था कार्यरत होऊन पदाधिकाºयांनी निवड झाली आहे.
ग्रामीण जीवन स्वावलंबी होण्यासाठी तत्रज्ञान अवगत करण्यासोबतच संरक्षीत शेती व संरक्षीत बाजारभाव या संकल्पना राबविल्या पाहिजे. केवळ पाण्याचा वापर करणे याच उद्देशाकरिता ही संस्था कार्यरत नसून परिसरातील शेतकºयांचे संघटन, पाण्यानुसार शेतजमिनीची निवड, शेतमालाची गुणवत्ता, उपलब्ध बाजारपेठ तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच आर्थिक गुंतवणूक सोडविण्यासाठी ही संस्था महत्वाची असल्याचेही मत मान्यवरांनी व्यक्त केले.

Web Title: Arvi Upsa Irrigation is the first model in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.