आर्वीच्या न.प. शाळेचा होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:51 AM2019-09-17T00:51:48+5:302019-09-17T00:52:09+5:30
शाळेची नवी इमारत ५५२ लक्ष रूपयांतून साकारण्यात येणार आहे. आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात झालेले हे सर्वात पवित्र काम आहे. याचा आपल्याला आनंद आहे, असे प्रतिपादन आर्वीचे नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : ज्या शाळेत मी शिकलो, ज्या शाळेने मला घडविले, ज्या शाळेत मला आयुष्यभराचे मित्र मिळाले, त्या शाळेची नवी इमारत ५५२ लक्ष रूपयांतून साकारण्यात येणार आहे. आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात झालेले हे सर्वात पवित्र काम आहे. याचा आपल्याला आनंद आहे, असे प्रतिपादन आर्वीचे नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी केले.
आर्वी शहराच्या विकासाला शंभर कोटींवर निधी मिळाला आहे. कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील गैरसोयी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमीत वानखेडे यांनी या शाळेला निधी उपलब्ध करून दिला, अशी माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला माजी आमदार दादाराव केचे, सुधीर दिवे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, उपाध्यक्ष सुनील बाजपेयी, अनिल जोशी, प्रशांत ठाकूर, विनय डोळे, डॉ. रिपल राणे उपस्थित होते. यावेळी अजय कटकमवार, मिथुन बारबैले, जगन गाठे, संजय थोरात, प्रकाश गुल्हाणे, कैलास गळहाट, हर्षल पांडे, नरसिंह सारसार, राहुल गोडबोले, कय्युमभाई उपस्थित होते.