आशा वर्कर बिनपगारी अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 11:28 PM2018-04-07T23:28:04+5:302018-04-07T23:28:04+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत देशभर होणारे बालमृत्यू व गर्भवती मातांचा मृत्यूदर थांबविणे तसेच ग्रामीण भागातील वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण शोधून त्यांना मार्गदर्शन करून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहचविण्याचे महत्त्वाचे कार्य आशा वर्कर महिला करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत देशभर होणारे बालमृत्यू व गर्भवती मातांचा मृत्यूदर थांबविणे तसेच ग्रामीण भागातील वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण शोधून त्यांना मार्गदर्शन करून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहचविण्याचे महत्त्वाचे कार्य आशा वर्कर महिला करतात. या कामाकरिता त्यांना रुग्णांच्या संख्येनुसार मानधन दिल्या जाते. या प्रकारामुळे आशा वर्कर बिनपगारी अधिकारी असल्याची खंत महाराष्ट्र आशा वर्कर संघटनेच्या राज्य अध्यक्ष आनंदी अवघड यांनी व्यक्त केली.
आशा वर्कर कर्मचारी संघटनेचे जिल्हा अधिवेशन नुकतेच गाडगेबाबा मठ सभागृह, कृष्णनगर येथे संपन्न झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर नागपूर राजेंद्र साठे, प्रिती मेश्राम तर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या रंजना सावरकर, कल्पना चहांदे, सिटूच्या संध्या संभे, सुनील घिमे, आशा वर्कर अर्चना देशमुख, अर्चना घुगरे, अरूणा मनोहरे, जयमाला झाडे, अलका पराते, भैय्या देशकर यांची उपस्थिती होती.
अधिवशेनाचे उद्घाटन सिटूचे कामगार नेते व नगरसेवक यशवंत झाडे यांनी केले. यावेळी बोलताना अवघडे म्हणाल्या, आशा वर्कर दरमहा मानधन शासनाकडून मिळत नाही. आजाराचे रुग्ण जसे जसे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले जातील व तेथे आरोग्य निदानाप्रमाणे त्यांना प्रती रुग्ण प्रमाणे रक्कम तिही तुटपुंजी अदा केली जाते. सर्व आशा वर्कर या सरकारी काम नियमित करूनही त्यांना दरमहा ठराविक मानधन नाही. त्यामुळे त्यांची गणना बिन पगारी सरकारी अधिकारी, अशीच आहे. यामुळे त्यांना ठराविक मानधन, सामाजिक सुरक्षा मिळावी, अशी मागणी या अधिवेशनात करण्यात आली.
आशा वर्कर ग्रामीण जनता व आरोय विभाग यांच्यातील दुवा आहे. शासन मात्र त्यांची अवहेलना करते. आता आशांचे कार्य राज्यातील काही जिल्ह्यात खासगी कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे. एकप्रकारे शासन या योजनेचे खासगीकरण करीत आहे. आशांना देण्यात येणाऱ्या प्रती रुग्ण दरापेक्षा कंत्राटी ठेकेदारांना दुप्पट तिप्पट दर शासन मंजूर करीत असल्याचा आरोप यावेळी केला.
अहवालवाचन भैय्या देशमुख यांनी केले. त्यावर चर्चा अरूणा मनोहरे, वैशाली मून, सुरेखा दुरतकर यांनी केले. यावेळी आगामी तीन वर्षांकरिता आशा वर्कर संघटनेची जिल्हा कार्यकारीणी निवडण्यात आली. संचालन अर्चना घुगरे यांनी केले तर आभार सिटूच्या रंजना सावरकर यांनी माणले. यशस्वीतेसाठी सुरेखा अंबुडायरे, दुर्गा कडू, संगीता ढोले, स्वाती भंडारी, हर्षकला पुरी, सुषमा कोल्हे, भारती राऊत, छाया हिवराळे, शुभांगी अढाऊ यांनी प्रयत्न केले.