महात्म्याने लावलेल्या पिंपळ वृक्षाच्या संरक्षणासाठी आश्रमाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:20 PM2018-06-25T23:20:47+5:302018-06-25T23:21:09+5:30
येथील आश्रमात बापूकुटीच्या फाटकाजवळ महात्मा गांधीजींनी लावलेले अजस्त्र पिंपळाचे झाड आहे. या झाडाला ८२ वर्षे लोटली आहेत. किडीचा प्रादुर्भाव झाल्याने हे झाड धोक्यात आले होते. याला संरक्षित करून हिरवेगार ठेवण्यासाठी आश्रमची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील आश्रमात बापूकुटीच्या फाटकाजवळ महात्मा गांधीजींनी लावलेले अजस्त्र पिंपळाचे झाड आहे. या झाडाला ८२ वर्षे लोटली आहेत. किडीचा प्रादुर्भाव झाल्याने हे झाड धोक्यात आले होते. याला संरक्षित करून हिरवेगार ठेवण्यासाठी आश्रमची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
१९३६ मध्ये महात्मा गांधीजींनी सेवाग्रामला राहण्याचा संकल्प जाहीर केला. त्यांच्या सोबत बा, मुन्नालाल शाह, बलवंतसिंग होते. मीरा बहन बापू येण्यापूर्वीपासून सेवाग्राम या मूळ गावात गणपतराव चव्हाण यांनी दिलेल्या जागेवर ाहत होत्या. आश्रमच्या कामाला प्रारंभ होताच सर्वप्रथम पिंपळाचे झाड लावण्यात आले. २४ तास प्राणवायू देणारे, अशी ख्याती या झाडाची आहे. ऋषी मुनींनी आश्रमात आणि जंगलात झाडांना महत्त्व दिले. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये झाडांना तोडण्यावर बंदी होती. यावरून त्या काळी झाडांचे महत्त्व जोपासले जाऊन संवर्धनावर अधिक भर होता, हे दिसून येते. यामुळेच ते झाड वाचविण्यासाठी आश्रम प्रतिष्ठाण धडपड करीत आहे. ते झाड बापूंनी लावले. ते प्रार्थना भूमी व बापूकुटीच्या मधे स्मारकासारखे उभे असल्याने त्याचे महत्त्व विसरता येत नाही.
झाड वाचविण्यासाठी उपाय
आश्रमात असलेली विविध प्रजातीची पारंपरिक झाडे, हे महात्मा गांधींच्या आश्रमाचे वैशिष्ट्य आहे. सध्या तरी पिंपळ वृक्षाला हिरवेगार करण्याकरिता माती, बकऱ्यांचे खत, बारीक वाळू तसेच उदळीचा नायनाट करण्यासाठी गोमुत्र आणि औषधी मूळाची तथा वती-भवती टाकण्यात येत आहे.