पिंपळ वृक्ष कीडमुक्त करण्यासाठी आश्रमची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:31 PM2018-05-17T21:31:13+5:302018-05-17T21:31:13+5:30

आश्रम परिसरात महात्मा गांधींनी लावलेले पिंपळाचे झाड आहे. या झाडाला कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. आश्रमाने पारंपरिक पद्धतीची उपाययोजना करून किडीचा नायनाट केला आहे.

Ashram's struggle to relieve pimple tree pest | पिंपळ वृक्ष कीडमुक्त करण्यासाठी आश्रमची धडपड

पिंपळ वृक्ष कीडमुक्त करण्यासाठी आश्रमची धडपड

googlenewsNext
ठळक मुद्देदिल्ली व नागपूरच्या पथकाने केली पाहणी : बुरशी नष्ट करण्यासाठी सूचविणार उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : आश्रम परिसरात महात्मा गांधींनी लावलेले पिंपळाचे झाड आहे. या झाडाला कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. आश्रमाने पारंपरिक पद्धतीची उपाययोजना करून किडीचा नायनाट केला आहे. दिल्लीच्या धानुका अ‍ॅग्रीटेक लिमिटेड नागपूर शाखेचे अभय जिभकाटे व सुमोध झारीया यांनी झाडाची पाहणी केली. किडीचा नायनाट करून झाड हिरवेगार करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, यावर त्यांनी अध्ययन केले.
शेगाव या ठिकाणी राहण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. प्रथम कुटी निर्माणानंतर बापूंनी १९३६ मध्ये पिंपळाचे रोपटे लावले. या झाडाला ८२ वर्षे झालीत. अनेक उन्हाळे, पावसाळे व हिवाळे या वृक्षांनी पाहिलेत. आश्रमच्या वातावरणात शुद्धता आणि प्राणवायूचे भरपूर सिंचन करून वातावरण प्रफुल्लीत ठेवण्याचे काम पिंपळ वृक्षाने केले; पण या झाडावर किडीने आक्रमण केल्याने संकट निर्माण झाले. आश्रमने शेण, गोमुत्र, कडूनिंब यांचे द्रावण करून झाडावरील बाधित भागावर शिंपडले. एवढेच नव्हे तर झाडाच्या परिसरातही ते टाकण्यात आले. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
बापूंनी लावलेल्या या झाडाबाबतची माहिती धानुका अ‍ॅग्रीटेक लि.चे प्रशासकीय व्यवस्थापक आर.जी. अग्रवाल यांना मिळाली. त्यांनी नागपूर शाखेचे उपप्रबंधक अभय जिभकाटे व दिल्लीचे प्रोडक्ट एक्झीक्युटीव सुबोध झारीया यांना झाडाची माहिती घेत अहवाल देण्यास सांगितले. इतिहासाचा साक्षीदार पिंपळ वृक्ष हिरवेगार व किडमुक्त कसे होईल, यावर उपाययोजना होणार असल्याने नक्कीच झाडाला नवसंजीवनी मिळणार आहे.

आश्रमाची स्थापना आणि पिंपळ रोपाची लागवड बापुंनी केली होती. स्मारकासोबत त्या झाडाचे सुद्धा महत्त्व आहे. झाडाला कीडे लागल्याने धोका निर्माण झाला होता. वनसंशोधन संस्थेकडे याबाबत विचारणा केली आहे. दिल्लीतील लोकांनी पाहणी केली असून ते उपाययोजना सूचवतील. झाड पूर्वीप्रमाणे हिरवेगार होऊन आयुष्य वाढावे हा आमचा प्रयत्न आहे.
- टी.आर.एन. प्रभु, अध्यक्ष, आश्रम प्रतिष्ठान.

अग्रवाल साहेबांना या झाडाविषयी माहिती मिळाली. त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठविले. झाडांना कीड व बुरशी दिसून येते. याचे फोटो व माहिती दिल्लीला पाठविण्यात येईल. जी उपाययोजना सूचवतील ती आश्रमच्या परवानगीने झाडावर करण्यात येईल. झाडांच्या मूळांना सेंद्रीय खत दिल्यास फायदा होईल. गांधीजींनी झाड लावले असल्याने त्याचे संरक्षण महत्त्वाचे आहे.
- अभय जिभकाटे, नागपूर.

Web Title: Ashram's struggle to relieve pimple tree pest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.