आष्टी तालुक्यात २२ हजार ५३७ हेक्टर पेरण्या झाल्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:47 PM2018-07-28T23:47:50+5:302018-07-28T23:48:22+5:30

यावर्षी मुरवणी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या दमात केलेल्या पेरण्या यशस्वी झाल्या आहे. गेल्या पाच वर्षात प्रथमच पेरण्या साधल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिकाची जोपासना करण्यासाठी शेतात निंदणीचे व तणनाशक फवारणी काम सुरू आहे.

In Ashti taluka completed 22 thousand 537 hectares | आष्टी तालुक्यात २२ हजार ५३७ हेक्टर पेरण्या झाल्या पूर्ण

आष्टी तालुक्यात २२ हजार ५३७ हेक्टर पेरण्या झाल्या पूर्ण

Next
ठळक मुद्देशेतकरी समाधानी : कापसाच्या क्षेत्रात यंदा झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : यावर्षी मुरवणी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या दमात केलेल्या पेरण्या यशस्वी झाल्या आहे. गेल्या पाच वर्षात प्रथमच पेरण्या साधल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिकाची जोपासना करण्यासाठी शेतात निंदणीचे व तणनाशक फवारणी काम सुरू आहे. शेतीच्या कामामुळ े ग्रामीण भागातील महिला व पुरूष मंडळी व्यस्त झाली आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी झालेल्या खरीप पेरणीमध्ये कपाशी पिकाची लागवड सर्वाधिक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मागील वर्षी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यानंतर त्याला पाहिजे तसेच भाव मिळाले नाही. सुरूवातीला २ हजार पासून २८०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. त्यानंतर ३२०० पासून ३४५० भाव मिळाला. याऊलट कापूस पिकाला सुरूवातीला ४ हजार ते ४६०० नंतर ४७०० ते ६२०० पर्यंत भाव मिळाला. कापसाचे उत्पादन समाधानकारक झाल्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास बसला. शिवाय भाव मिळाल्याने जास्त हमी देऊन आर्थिक फायदा झाला.
कृषी विभागाचे विस्तार अधिकारी विजय देशपांडे म्हणाले की, सध्या ९१.७७ टक्के खरीप पेरण्या झाल्या आहे. यामध्ये २२ हजार ५३७ हेक्टरवर कुठेही दुबार पेरणी आली नाही. शेतकरी पावसाच्या भरवश्यावर पेरणी करतात सुरूवातीला जूनच्या पंधरवाड्यात करण्यात आलेल्या पेरणी मध्ये ओलिताद्वारे पाणी देण्यात आले आहे.
उर्वरीत पिकांची वाढही समाधानकारक आहे. शेतामध्ये तणाचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी डवरणी व तणनाशक फवारणीच्या कमी लागले आहे.
यावर्षी पीक उत्पादनाला हमीभाव जाहीर झाला आहे. त्यामुळे शाश्वत भाव हक्काने मिळणार आहे. शेतकºयांनी चांगल्या प्रकारे पिकनियोजन केले आहे.
निसर्गाने साथ दिल्यास भरघोष उत्पादन होण्याचा अंदाज शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बँकाकडून कर्ज मिळण्यास बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशाही स्थितीत शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करून महागडे बि-बियाणे खते विकत घेवून पेरणी केली आहे.

Web Title: In Ashti taluka completed 22 thousand 537 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.