वर्ध्यात सहायक नगर रचनाकारास लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:25 AM2018-04-04T11:25:22+5:302018-04-04T11:25:30+5:30

जागेचा नकाशा मंजूर करून घेण्याकरिता २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक नगर रचनाकारास रंगेहात अटक करण्यात आली.

Asistant engineer arrested for taking a bribe in Wardha | वर्ध्यात सहायक नगर रचनाकारास लाच घेताना अटक

वर्ध्यात सहायक नगर रचनाकारास लाच घेताना अटक

Next
ठळक मुद्दे२५ हजारांची लाच घेतली

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जागेचा नकाशा मंजूर करून घेण्याकरिता २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक नगर रचनाकारास रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई वर्धा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी केली.
तक्रारदाराला रोहणा येथील शेत सर्व्हे क्र. १२४/१ ब या त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या जागेवर पेट्रोलपंप सुरू करायचा होता. यासाठी जमीन अकृषक संबंधाने नकाशा मंजूर करण्यासाठी नगर रचनाकार कार्यालय वर्धा येथे अर्ज केला. यावर सहायक नगर रचनाकार नंदकिशोर तुळशीराम लाडोळे याने नकाशा मंजूर करण्याकरिता २५ हजार रुपयांची लाच मागितली; पण अर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा येथे तक्रार नोंदविली. यावरून सापळा रचण्यात आला. प्रथम २५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यावरून त्यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याअन्वये शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्यवाही अ‍ॅन्टीकरप्शनचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील नागपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब गावंडे, पोलीस निरीक्षक अभय दाभाडे, रामजी ठाकूर, रोशन निंबोळकर, अतुल वैद्य, सागर भोसले, श्रीधर उईके आदींनी केली.

Web Title: Asistant engineer arrested for taking a bribe in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा