शेतकºयांच्या प्रश्नांवर पक्षविरहीत काम व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:20 AM2017-11-06T00:20:23+5:302017-11-06T00:20:39+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी शेतकºयांना कर्जमाफी, हमीभाव आदिंची हमी दिली होती; मात्र प्रत्यक्षात शेतकºयांचा भ्रमनिरास झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी शेतकºयांना कर्जमाफी, हमीभाव आदिंची हमी दिली होती; मात्र प्रत्यक्षात शेतकºयांचा भ्रमनिरास झाला आहे. शेतकºयांच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रीत येवून ते सोडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार व लोकमत एडीटोरिअल बोर्डाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी केले.
रविवारी हिंगणघाट येथे एका कार्यक्रमासाठी ते आले असताना आमदार समीर कुणावार यांच्या निवासस्थानी त्यांचा कुणावार परिवाराच्यावतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी आ. समीर कुणावार, श्रध्दा कुणावार, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, भाजपचे जिल्हासचिव प्रा. किरण वैद्य, भाजपा जिल्हा सरचिटनिस किशोर दिघे, माजी पंचायत समिती सदस्य वामन चंदनखेडे, डॉ. विनोद बोरा, राजेंद्र चोरडिया आदी उपस्थित होते. यावेळी आ. कुणावार यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या उपक्रमांची माहिती विजय दर्डा यांना दिली. राज्यभरात समाधान शिबिराचे आयोजन होत आहे. हा उपक्रम हिंगणघाट मतदार संघातूनच सुरू झाला. आता तो राज्यातील विविध भागात राबविला जात असल्याची माहिती त्यांनी विजय दर्डा यांना दिली.