घर बांधायला सांगितले,आता पैशाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 05:05 AM2020-05-03T05:05:00+5:302020-05-03T05:05:02+5:30

ज्या कुटुंबांना घरकुल मंजूर होताच ते परिवार कामालाही लागले. यात बहुतांश नागरिक हे स्वमालकीच्या जागेवर मोडक्या तोडक्या घरात राहणारे तसेच घर नसलेले आहेत. अनेक परिवार आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अजूनही किरायाच्या घरात राहतात. यासर्व कुटुंबांना शासनाच्यावतीने पहिली किस्त प्रात्प होताच त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली.

Asked to build a house, now what about the money? | घर बांधायला सांगितले,आता पैशाचे काय?

घर बांधायला सांगितले,आता पैशाचे काय?

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना संकटाचे दाहक वास्तव। लाभार्थ्यांसमोर आर्थिक संकटाचे डोंगर उभे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाने प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे म्हणून मोठा गाजावाजा करुन घरकुल योजना सुरू केली. पंतप्रधानांच्या या महत्वाकांक्षी योजनेने अनेकांनी आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न रंगविले. अनेकांनी योजनेच्या अधीन राहून हक्काच्या जागेवर बांधण्यास सुरूवातही केली. सुरुवातीला अनुदानाच्या किश्ती बरोबर मिळाल्या. पण, आता मात्र, अनुदानाच्या पुढील किश्ती मिळणे थांबले आहे. न मिळण्यामागे यंत्रणेचे उत्तर एकच, ते म्हणजे कोरोनाचे संकट.
नगरपालिकेंतर्गत पंतप्रधान आवास योजनेकरीता घरकुल मिळण्यास शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी अर्ज केले. यामध्ये टप्प्या-टप्प्याने अर्जांना मंजूरी देण्यात आली. ज्या कुटुंबांना घरकुल मंजूर होताच ते परिवार कामालाही लागले. यात बहुतांश नागरिक हे स्वमालकीच्या जागेवर मोडक्या तोडक्या घरात राहणारे तसेच घर नसलेले आहेत. अनेक परिवार आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अजूनही किरायाच्या घरात राहतात. यासर्व कुटुंबांना शासनाच्यावतीने पहिली किस्त प्रात्प होताच त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. अगोदरच जीवनात विविध समस्यांचा सामना करणाऱ्या परिवारांना घर बांधताना अनेक अडचणी आल्या. जिल्ह्यातील सर्व वाळूघाट मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने अव्वाच्या सव्वा दराने वाळू विकत घ्यावी लागली. कसेबसे बांधकाम स्लॅब लेव्हलला नेले. काही लाभार्थ्यांनी आपापले बांधकाम पूर्ण केले. योजनेच्या अधिकाऱ्यांनी मोजमाप आणि नियमात बसवून सर्व शासकीय सोपस्कार आटोपले. पैसे मिळण्याची वेळ आली आणि अघटित घडले. कोरोना आजाराने शिरकाव केला. हे संकट रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आणि जनजीवन विस्कळीत होवून सर्व चाके जागीच थांबली.
एक महिन्याचा कालावधी लोटूनही शासकीय कामे बंद आहेत. परिणामी, लाभार्थ्यांपुढे मोठी आर्थिक अडचण आणि पेच निर्माण झाला आहे. अनेकांनी स्वत:चे झोपडीवजा घर मोडले. किरायाने राहणे सुरू केले. अशात अनेकांचे घरकुलही पूर्ण झालेले नाही. त्यात शासकीय अनुदानाची किस्त मिळणे थांबले आहे. ज्या दुकानदारांकडून बांधकाम साहित्य घेतले ते आता पैशाचा तगादा लावत आहेत. कारण त्यांनाही मोठ्या व्यापाºयांना पैसे द्यायचे आहेत.
पावसाळा अवघ्या दीड महिन्यांवर आला आहे. महिनाभरापासून हाताला काम नाही. जवळ असलेले पैसे काही घरच्या कामात उपयोगात आणाले, तर काही घरखर्चात निघून गेले. सध्या इकडे आड, तिकडे विहीर... अशी अवस्था शहरातील घरकुल लाभार्थ्यांची झाली आहे. शासनाने या समस्येचे तत्काळ समाधान करण्यासाठी शिल्लक रक्कम घरकुल लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लाभार्थी पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत
घरकुल योजनेमार्फत लाभार्थ्यांनी घर बांधकामाला सुरूवात केली असता कोरोनामुळे कामे स्थगीत झाली. अशा परिस्थितीत निम्मेच कर्मचारी कामावर येत असल्याने अडचण निर्माण होत आहे. सर्व सुरळीत कधी होणार आणि घराचे स्वप्न कधी पूर्ण होणार अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.

Web Title: Asked to build a house, now what about the money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.