अस्मानी, सुल्तानी संकटांचा शेतकरी व व्यापाऱ्यांनाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:51 PM2017-11-24T23:51:23+5:302017-11-24T23:51:34+5:30
राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक वातावरणातील बदलाचा परिणाम शेती, शेतकरी व व्यापाऱ्यांवर होत आहे.
प्रभाकर शहाकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक वातावरणातील बदलाचा परिणाम शेती, शेतकरी व व्यापाऱ्यांवर होत आहे. बहुदा दसऱ्याला सितदही झाल्यानंतर दिवाळीत कापसाची बाजारपेठ फुलू लागते; पण मागील काही वर्षांत नैसर्गिक बदल, नापिकी, कर्जबाजारी झालेला शेतकरी यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. या अस्मानी, सुल्तानी संकटामुळे शेतकरी तथा व्यापाºयांनाही फटका बसत आहे.
शेतमाल खरेदी करणारा व्यापारी, शासनाने लादलेली नोटबंदी, सेवाकर व कॅशलेस अर्थव्यवस्थेमुळे त्रस्त आहे. यासह स्थानिक समस्यांचा सामनाही शेतकरी, व्यापाऱ्यांना करावा लागतो. परिणामी, कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक नसल्याचे चित्र शहरातील दोन्ही कापूस खरेदी केंद्रावर दिसून येत आहे.
शहरात पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सोरटा शिवारातील नर्मदा कॉटेक्स या केंद्रावर कापूस खरेदी सुरू आहे. गुरूवारपर्यंत ३०२१.५६ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून कापसाला सरासरी ४४०० ते ४६५० रुपये भाव देण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव सुनील राजपूत यांनी दिली. शहरातील श्री साई स्कॉटपीन या खासगी कापूस केंद्रावर आतापर्यंत २५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. येथे कापसाला ४६५० ते ४७५० रुपये भाव देण्यात आला आहे. शासनाची नोटबंदी, जीएसटी, कॅशलेस आर्थिक व्यवहाराचा फटका बसल्याने शेतकºयांकडून फारच कमी प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणला जात असल्याचे या केंद्रांच्या संचालकांनी सांगितले.
केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेऊन आलेले दहेगाव (धांदे) येथील शेतकरी राजू रंगारी व माणिक रामटेके यांनी समस्या कथन केल्या. शेतकºयांनी अस्मानी व सुल्तानी अशा दोन्ही संकटांचा सामना करावा लागत आहे. उभ्या शेतमालावर निसर्ग व हानी पोहोचविणाºया किटकांचा उपद्रव, वाढलेली मजुरी, कापूस खरेदी केंद्रापर्यंत माल आणण्याचा खर्च पाहता शेतकºयाला खर्च व परिश्रमाच्या तुलनेत शेतकºयाला कापूस ३ हजार क्विंटल पडत असल्याच्या व्यथाही शेतकरी मांडतात. एकेकाळी शहरातील कापूस खरेदी केंद्रावर बैलगाड्यांची रांग लागत होती; पण आज केवळ ३०० ते ५०० क्विंटलची आवक असल्याचे खरेदी केंद्रावर दिसून आले.
दोन केंद्रांवर केवळ ५ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी
पुलगाव शहरात दोन केंद्रांवर कापूस खरेदी केली जात आहे; पण या केंद्रांवर कापसाची आवक कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. आजपर्यंत दोन केंद्रांवर केवळ ५ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. दोन्ही केंद्रांवर बºयापैकी भाव दिला जात असला तरी शेतकरी फारसा कापूस विक्रीसाठी आणत नसल्याचे दिूसन येत आहे. यामुळे कापसाची बाजारपेठ मंदावल्याचेच दिसते.