चौफुली होतेय अपघातप्रवण स्थळ

By admin | Published: April 12, 2015 01:58 AM2015-04-12T01:58:07+5:302015-04-12T01:58:07+5:30

अनियंत्रित आणि बेसावधपणे भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे अनेक अपघात होत आहेत.

An asteroid is an accidental place | चौफुली होतेय अपघातप्रवण स्थळ

चौफुली होतेय अपघातप्रवण स्थळ

Next

पुलगाव : अनियंत्रित आणि बेसावधपणे भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे अनेक अपघात होत आहेत. दररोज होत असलेले किरकोळ अपघात टाळण्यासाठी स्थानिक आदर्श हायस्कूल समोरील चौफुलीवर गतिरोधक बसवण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. या चौफुलीवर विद्यार्थ्यांची वरदळ अधिक असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
पुलगाव शहर आकाराने वाढत आहे. या तुलनेत रस्त्यांची संख्या कमी होत आहे. शिवाय शहरालगत महामार्ग गेल्याने त्यातील काही वाहने शहरात येत आहे. शहरात वाहनांची संख्या वाढल्याने स्टेशन चौक ते पंचधारा नाक्यापर्यंतच मार्गावरील रहदारी वाढली आहे. वाहनांची संख्या वाढल्याने पादचाऱ्यांना पायी चालणे कठीण झाले आहे. नाचणगाव मार्गे यवतमाळकडे जाणारी जड वाहन याच मार्गाने जातात. शहरातील शाळा विद्यालये याच मार्गावर आहे. यामुळे सकाळी शाळा सुरू होताना व सायंकाळी शाळा सुटण्याच्या मार्गावर येथे गर्दी वाढत असते. अशात स्टेशन चौकापासून तर पंचधारा मार्गापर्यंत हरिराम नगरातून जाणाऱ्या सरळ मार्गावरील वाहतूक वाढली आहे. फारशी वाहतूक नसल्याने दुचाकी वाहक भरधाव वाहने चालविचत असतात. स्कूल बसेस विद्यार्थ्यांची ने-आण करतात. या मार्गावरील मील मागील भागात असलेल्या नाल्यावरील भींत तुटल्याने भरधाव वाहन सरळ नाल्यात पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसे अपघात येथे झाल्याची नोंद आहे. या भागात मोठे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या मार्गावर असलेल्या चौफुलीवर अपघात प्रवण स्थळ असे फलक लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. याकडे वाहतूक पोलीस व संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करण्याची गरज वर्तविली जात आहे. चौफुलीवर मोठा अपघात होण्यापूर्वी येथे गतिरोधक निर्माण करण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: An asteroid is an accidental place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.