गौळ येथे विहिर खचली, दोन मजुरांची मृत्यूशी झूंज सुरु, एसडीआएफच्या टिमकडून बचावकार्य सुरु
By चैतन्य जोशी | Published: March 1, 2023 06:33 PM2023-03-01T18:33:38+5:302023-03-01T18:33:55+5:30
नजीकच्या गौळ शिवारात वरभे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरु असतानाच ५० फूट खोल विहिर खचल्याने दोन मजूर मलब्याखाली दबले असून त्यांची मृत्यूशी झूंज सुरु आहे.
सिंदी (रेल्वे) : नजीकच्या गौळ शिवारात वरभे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरु असतानाच ५० फूट खोल विहिर खचल्याने दोन मजूर मलब्याखाली दबले असून त्यांची मृत्यूशी झूंज सुरु आहे. ही घटना १ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास गौळ येथे घडली. गौळ शिवारात वरभे यांच्या शेतातील ५० फूट खोल विहिरीचे खोदकाम सुरु होते.
दरम्यान, विहिरीचा वरील भाग खचला. विहिरीचा काही भाग खचताना दिसताच काम करीत असलेले दोन मजूर विहिरीबाहेर येण्याची धडपड करीत होते. मात्र, मलब्याखाली दोन्ही मजूर दबले. याची महिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी एसडीआरएफची टिम पोहचली असून बचावकार्य सुरु आहे.
तसेच तीन जेसीबीच्या सहाय्याने विहिरीतील मलबा उपसण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी आबुराव सोनवणे, तहसीलदार राजू रणवीर, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी धाव घेतली. वृत्त लिहिस्तोवर मजूरांची नावे कळू शकली नाही.