एटीएमची डोकेदुखी कायमच

By admin | Published: May 8, 2017 12:45 AM2017-05-08T00:45:21+5:302017-05-08T00:45:21+5:30

नोटाबंदीला सहा महिने झाले तरी एटीएम सेवेचे रोख नसण्याचे रडगाणे सुरूच आहे. शहरातील बहुतांश

ATM's headache forever | एटीएमची डोकेदुखी कायमच

एटीएमची डोकेदुखी कायमच

Next

ग्राहकांना मनस्ताप : बँकेपुढे ग्राहकांच्या रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : नोटाबंदीला सहा महिने झाले तरी एटीएम सेवेचे रोख नसण्याचे रडगाणे सुरूच आहे. शहरातील बहुतांश एटीएम केंद्रापुढे बऱ्याचवेळा ‘नो कॅश’चे फलक झळकत असतात. त्यामुळे सामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बॅँक प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे तक्रार तरी कुणाकडे करावी असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
एटीएम केंद्र बंद राहत असल्याने बॅँकांपुढे ग्राहकांच्या रांगा लागतात. अनेकदा सर्व ग्राहकांना रोकड पुरविण्यात बँक प्रशासन कमी पडत असल्याचे दिसते. शासनाकडून कॅशलेस व्यवहार करण्याकरिता प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे तर हे अलिखीत धोरण अंमलात आणले जात नाही ना, असा संशय सध्या ग्राहकांतून व्यक्त केला जात आहे. येथील एटीएम मोठ्या प्रमाणावर कॅशलेस झाल्याने रोख रक्कम काढताना ग्राहकांची चांगलीच दमछाक होत आहे. बऱ्याच एटीएम केंद्रात रोकड नसल्याचे फलक लावून बँक प्रशासन जबाबदारीतून मुक्त होतात. येथील काही एटीएम अनेक महिन्यांपासून बंद आहे. याची तक्रार करुनही सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. बहुतांश एटीएम पुर्णवेळ सेवा देत नसल्याने बॅँक ग्राहकांची गोची होते. एकीककडे एटीएम वापरावर निर्बंध आले आहे. अशात जे एटीएम केंद्र महिनोंगनती बंद आहे त्या बँक ग्राहकांना नाईलाजास्तव अन्य एटीएम मधुन रोख काढावी लागते. त्यामुळे नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
एटीएम मधुन रोल्ह काढण्यासाठी भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. ज्या एटीएममध्ये रोकड असते तेथे लोकांची गर्दी होत असल्याने ताटकळत राहावे लागते. भर उन्हात उभे राहताना वृद्ध नाफरिकांना त्रास होतो. एटीएम केंद्र सुरळीत करण्याची मागणी ग्राहकातून होत आहे.
कॅशलेस व्यवहाराला चालना मिळावी म्हणून शासन प्रयत्नरत आहे. मात्र येथे कॅशलेस व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांनी दैनंदिन व्यवहार कसे पाराडावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बॅँकांना त्यांच्या मागणीप्रमाणे रोकड उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना रोकड वाटप करताना अडचण येत असल्याचे समजते. एटीएम केंद्रात खडखडाट असल्याने ग्राहकांना बँकेत जाण्याखेरीज पर्याय नसतो. रोख व्यवहारावर नियंत्रण आल्याने ग्राहकांची कोंडी वाढतच आहे. याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. कॅशलेस व्यवहार वाढविण्यासाठी येथे सक्षम यंत्रणा उभी करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.
नोटाबंदीनंतर व्यवहार सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागेल असे सांगण्यात आले. मात्र सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी व्यवहार सुरळीत झाले नसल्याने हिंगणघाटवासी त्रस्त झाले आहे. येथील एटीएममध्ये ठणठणाट असल्याने ग्राहकांची पायपीट सुरू असते. त्यामुळे एटीएम व्यवस्थेवरील सामान्यांचा विश्वास डळमळीत होत असून याकडे बँक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे. शासनाने सर्वसामान्यांना होणारा त्रास पाहता वेळीच उपाययोजना करणे गरजेचे ठरत आहे.

पैसे काढण्यासाठी भटकंती
पैसे बॅँकेत असताना ते वेळेवर उपलब्ध होत नसेल तर काय कामाचे, असा प्रश्न एका त्रस्त विद्यार्थीनीने व्यक्त यावेळी केला. असदर विद्यार्थिनी हिंगणघाट येथून मुंबईला नोकरीच्या मुलाखतीकरिता जात होती. प्रवासाकरिता तिला पैसे हवे असल्याने एटीएम केंद्रात ती गेली असता कॅश न मिळाल्याने तिला विनातिकीट प्रवास करावा लागला. असाच प्रकार काही हिंगणघाटवासींना एटीएममध्ये रोख न मिळाल्याने सहन करावा लागला. एटीएममुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत.

मग, एटीएम केंद्र कशासाठी?
बॅँक ग्राहकांना त्यांच्या खात्यातील रक्कम कधीही, केव्हाही काढता यावी यासाठी दिलेली ही सुविधा ग्राहकांना मनस्ताप देणारी ठरत आहे. नोटाबंदीनंतर या सुविधेला ग्रहण लागले आहे. येथील बॅँकांना रोकड कमी पुरविण्यात येत असल्याने असे प्रकार घडत असल्याची माहिती आहे.

बँकांमध्ये रोखेचा तुटवडा
शासनाकडून कॅशलेस व्यवहार वाढविण्याच्या प्रयत्नात बॅँकांना रोख कमी मिळत आहे. परिणामी एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट असतो. महिन्याभरात येथील एटीएम काही दिवस वगळता बंदच असतात. शहरी व ग्रामीण भागात त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून उपाययोजना करण्याची मागणी आहे.

 

Web Title: ATM's headache forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.