१.६५ लाख शिधापत्रिकाधारक आधारशी संलग्न

By admin | Published: July 12, 2017 02:02 AM2017-07-12T02:02:19+5:302017-07-12T02:02:19+5:30

प्रत्येक व्यवहाराकरिता आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डाशिवाय लाभ मिळणे कठीण असल्याने जिल्ह्यातील

Attached to 1.65 lakh ration card holder basis | १.६५ लाख शिधापत्रिकाधारक आधारशी संलग्न

१.६५ लाख शिधापत्रिकाधारक आधारशी संलग्न

Next

महेश सायखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रत्येक व्यवहाराकरिता आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डाशिवाय लाभ मिळणे कठीण असल्याने जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ५१५ पैकी १ लाख ६५ हजार ६९४ नागरिकांनी त्यांचे आधार कार्ड शिधापत्रिकेशी संलग्न केले आहे. उर्वरीत नागरिकांना त्यांचे आधार कार्ड शिधापत्रिकेशी संलग्न करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
शिधापत्रिका धारक असलेल्या गरजू कुटुंबीयांना शासनाच्यावतीने विविध योजनांच्या माध्यमातून धान्यसाठा वितरीत केल्या जातो. ज्या गरजू कुटुंबियांकडे घरगुती वापराचे सिलिंडर नाही त्यांना शासनाच्यावतीने केरोसीनही पुरविल्या जात आहे. या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याकरिता ६७ हजार ४१० क्विंटल धान्याचे आवंटन प्राप्त होते. स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता रहावी यासाठी जिल्हा पुरवठा विभाग प्रयत्न करीत आहे.
जिल्ह्यात प्राधान्य गट योजनेंतर्गत १ लाख ५५ हजार ८६१ प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना लाभ मिळतो. अंत्योदय अन्न योजनेंतर्गत ४४ हजार २४१ अंत्योदय शिधापत्रिका, एपीएल शेतकरी योजनेंतर्गत ४९ हजार ३५८ गरजु कुटुंबियांना धान्य वितरीत करण्यात येत आहे. अन्नपूर्णा योजनेत जिल्ह्यात १ हजार ४५१ लाभार्थी असून त्यांना साठा उपलब्धतेनुसार गहु किंवा तांदुळ १० किलो अथवा पाच किलो गहु व पाच किलो तांदुळ मोफत दिल्या जात आहे. सदर धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी तसेच खरे लाभार्थी सहज शोधता यावे यासाठी शिधापत्रिका धारकांना आपला आधार संलग्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत असलेल्या जिल्ह्यातील ८९ टक्के शिधापत्रिका धारकांनी सध्यास्थितीत आधार संलग्न केल्याचे सांगण्यात आले. उर्वरित १९ हजार ८२१ शिधापत्रिका धारकांचे आधार संलग्न करण्यासाठी पुरवठा विभाग प्रयत्नरत आहे.

जुलै महिन्याचे आवंटन
जुलै महिन्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाला प्राधान्य गट योजनेच्या लाभार्थ्यांसाठी २३ हजार ५४० क्विंटल गहू व १५ हजार ६९० क्विंटल तांदूळ, अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ८ हजार ९६० क्विंटल गहू व ६ हजार ७२० क्विंटल तांदूळ व एपीएल शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ७ हजार ५०० व ५ हजार क्विंटल तांदूळ तसेच ४३२ क्विंटल साखर प्राप्त झाली असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Attached to 1.65 lakh ration card holder basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.