हत्येचा प्रयत्न; दोघांना पाच वर्ष सश्रम कारावास
By admin | Published: April 14, 2017 02:07 AM2017-04-14T02:07:26+5:302017-04-14T02:07:26+5:30
हाताचा पंजा कापून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या खरांगणा पोलीस ठाण्यातील प्रकरणाचा निकाला गुरुवारी लागला.
तिघांना सहा तर एकाला तीन महिन्यांची शिक्षा
वर्धा : हाताचा पंजा कापून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या खरांगणा पोलीस ठाण्यातील प्रकरणाचा निकाला गुरुवारी लागला. यात सहा जणांना शिक्षा ठोठावण्यात आली. रामा दमडु वाघमारे व लक्ष्मण दमडु वाघमारे व या दोघांना पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली.
तर दमडू बापुराव वाघमारे, राधाबाई दमडु वाघमारे, रवी विठ्ठल आंबेकर या तिघांना ६ महिने तसेच विठ्ठल गंगाधर आंबेकरला तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल अति. सत्र व न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी दिला.
थोडक्यात हकीकत अशी की, दिवाळी सणाच्या आदल्या दिवशी रमेश मुरारी व त्यांच्या पत्नीला रामा वाघमारे याने दारू पिऊन शिवीगाळ केली. मुरारी आणि त्याच्या पत्नीने याची खरांगणा पोलिसात तक्रार दिली. याचा वचपा काढण्याकरिता रामा वाघमारे याने २१ नोंव्हेंबर २०१२ रोजी सायंकाळी मुरारीच्या जावई, पुतन्या आणि वडीलावर लक्ष्मण व दमडू वाघमारे यांच्या मदतीने हल्ला केला. यात रामा वाघमारे याने तलवारीने एकाच्या डावा हाताचा पंजा हातापासून वेगळा केला. तर दुसऱ्याच्या मानेवर वार केला. तसेच दमडू वाघमारेकडे आलेले पाहुने विठ्ठल आंबेकरही व रवी आंबेकर यानेही मुरारी कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. घटनेची तक्रार खरांगणा पोलिसात दिली. पोलीस बोरिगिड्डे यांनी तपास पूर्ण करून दोषारोप पत्र दाखल केले.
शासनातर्फे १५ साक्षीदार तपासले. सरकारतर्फे शासकीय अभियोक्ता जी.व्ही. तकवाले यांनी युक्तिवाद केला.(प्रतिनिधी)