दुकान हटविले म्हणून निराश युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 07:20 PM2022-03-30T19:20:58+5:302022-03-30T19:21:25+5:30
Wardha News ग्रामपंचायतीने अतिक्रमणाच्या कारवाईत स्टेशनरीचे दुकान हटविल्याच्या घटनेमुळे निराश झालेल्या युवकाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना येथे बुधवारी दुपारी घडली.
वर्धा: नांदपूर येथे बुधवारी एका युवकाने ग्राम पंचायत नांदपूरच्या अन्यायाविरोधात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिक्रमण हटविण्या दरम्यान सर्व अधिकारी, पोलिस व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत घडली. युवकाचे नाव सुरज धर्मपाल मुन्दरे (30) असून, जिल्हा रुग्णालय अमरावती येथे उपचार सुरू आहे. ही घटना दुपारी 12.30 च्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की, युवक सुरज धर्मपाल मुन्दरे यांनी ग्राम सेवकऱ्यांच्या जुन्या क्वार्टरच्या बाजूला स्टेशनरी दुकान आहे. तसेच इतर लोकांनी देखील त्या ठिकाणी त्यांची घरे बांधलेली आहेत. ग्राम पंचायत नांदपूर यांनी ही शासकीय जागा घरे बांधलेल्या लोकांच्या नावे करून दिली आहेत.
ग्रामपंचायतीने सूरज यांच्या दुकानाची जागा तेथे घर बांधलेल्या व्यक्तींचा नावे केली व सुरज यांना दुकान हटविण्याची नोटीस दिली. आज दुकान हटविण्याची कारवाई ग्राम पंचायत नांदपूर करत होते. या घटनेने व्यथित होऊन सुरज यांनी हे पाऊल उचलले.