देशी कट्ट्याची विक्री करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 10:08 PM2017-08-24T22:08:56+5:302017-08-24T22:09:25+5:30

अवैधरित्या देशी कट्ट्याची विक्री करणाºयाला पकडण्याकरिता रचलेल्या सापळ्यातून मुख्य आरोपी पसार झाला तर त्याला सहकार्य करणाºया अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली.

Attend sellers of domestic cart | देशी कट्ट्याची विक्री करणारा अटकेत

देशी कट्ट्याची विक्री करणारा अटकेत

Next
ठळक मुद्दे पोलिसांना चकमा देत मुख्य आरोपी पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्यामजीपंत) : अवैधरित्या देशी कट्ट्याची विक्री करणाºयाला पकडण्याकरिता रचलेल्या सापळ्यातून मुख्य आरोपी पसार झाला तर त्याला सहकार्य करणाºया अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी पिस्तुल, काडतूस असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रात्री केली.
पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईत मुख्य आरोपी टोनिसिंग किसनसिंग बावरी रा. तळेगाव (श्या.पंत) हा पळ काढण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पोलीस सुत्रानुसार, टोनिसिंग किसनसिंग बावरी रा. तळेगाव(श्या.पंत) हा आर्वी येथील सहकार सभागृहाच्या मैदानात देशी कट्टा (पिस्तुल) घेवून विक्रीकरिता येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान टोनिसिंग त्याचा साथीदार नातेवाईक विधीसंघर्षीत बालकासह दुचाकीने पोहोचला. सापळा रचून घेराबंदी करून या दोघांना पकडण्याच्या प्रयत्नात पोलीस असताना टोनीसिंग बावरी हा मोटरसायकल घेवून पसार झाला. पाठलाग करुन त्याच्या अल्पवयीन साथीदारास अटक करण्यात आली. त्याची अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीचे मॅग्जीन असलेले पिस्टल मिळून आले. या पिस्तुलाची किंमत ७० हजार रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये दोन्ही आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग पोटे, पोलीस उपनिरीक्षक अचलकुमार मलकापुरे, उदयसिंग बारवाल, नामदेव किटे, हरिदास काकड, दिवाकर परीमल, अमर लाखे, आनंद भस्मे, समीर कडवे, अमित शुक्ला, वैभव कट्टोजवार, दीपक जाधव, अनुप कावळे यांनी केली.

Web Title: Attend sellers of domestic cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.