महिलांंवरील वाढत्या अत्याचाराने समाजमन सुन्नयुवकांनी वेधले पोलीस अधीक्षकांचे लक्ष
By admin | Published: September 18, 2015 01:58 AM2015-09-18T01:58:39+5:302015-09-18T01:58:39+5:30
स्त्रियांवरील अत्याचार व शाळा महाविद्यालयातील मुलींच्या दैनंदिन समस्या वाढत आहे. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी येथील युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना निवेदन दिले.
देवळी : स्त्रियांवरील अत्याचार व शाळा महाविद्यालयातील मुलींच्या दैनंदिन समस्या वाढत आहे. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी येथील युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना निवेदन दिले. यावेळी आवश्यक उपाययोजना करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी विविध समस्यांकडे लक्ष वेधले. दिवसेंदिवस स्त्रियांवरील वाढते अत्याचार समाजमन सुन्न करणारे ठरत आहे. कार्यालयीन कामे, नोकरी, महाविद्यालयीन शिक्षणास बाहेरगावी जाणाऱ्या स्त्री व युवतींना याचा त्रास सहन करावा लागत आहे. इंटरनेटचा दुरूपयोग करून मुलींना ब्लॅकमेल केले जात आहे. मोबाईल रिचार्ज करताना संबंधित दुकानदाराकडून युवतीचा नबर घेऊन त्रास दिला जात आहे. एकतर्फी पे्रमातून शाळा महा.तील युवतींची अश्लिल शब्दात निर्भत्सना करण्यात येत आहे. बस व आॅटोने प्रवास करताना तसेच रस्त्याने पायदळ जाताना गुंड व्यक्तीच्या हावभावांना सामोरे जावे लागत आहे. छेडखाणीचे प्रकार नित्याचेच झाल्याने अनेकांनी जीवनयात्रा संपविले आहे. बदनामीच्या भीतीने अनेक प्रकरणे उजेडात येत नसल्याने गावगुंडांचे चांगलेच फावते. दक्षता घेण्याच्या हेतूने शाळा, महाविद्यालयात आठवड्यातून एकदा महिला पोलीस शिपाई पाठवून समस्यांची उकल करावी, महा.मध्ये तक्रार पुस्तिका देऊन युवतीची मते जाणून घ्यावी, लैंगिक अत्याचाराच्या निरसनासाठी स्त्री अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आदी बाबींवर पोलीस अधीक्षक गोयल यांच्याशी चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळात प्रवीण फटींग, रवी झाडे, गोपाल अग्रवाल, गणेश शेंडे, आशिष शेंडे, आशीष सोनपितळे, हेमंत राऊत, सुमीत घोडमारे, रमेश आदमने, गोल्डी बग्गा, आकांक्षा उगेमुगे, स्वाती बीहाडे, पवन कुबडे व पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)