सभापती निवडीकडे लक्ष
By admin | Published: January 3, 2017 12:50 AM2017-01-03T00:50:40+5:302017-01-03T00:50:40+5:30
जिल्ह्यातील सहाही पालिकेचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतर आता सर्वांच्या नजरा
सहा पालिकेत आज निवड : वर्धेतील सभापती निश्चित ?
वर्धा : जिल्ह्यातील सहाही पालिकेचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतर आता सर्वांच्या नजरा पाचही विषय समितीच्या सभापतींकडे लागल्या आहेत. या जागांकरिता अनेकांनी आपली फिल्डींग लावली आहे. यात कोणाची वर्णी लागेल याचा खुलासा लवकरच होणार असून सहाही पालिकेत उद्या मंगळवारी विषय समिती सभापतींची निवड होणार आहे.
वर्धा पालिकेत सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष अतुल तराळे व उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर यांच्यासह पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका विशेष सभेत निवड होणार आहे. या सभापती पदी आपली वर्णी लागावी याकरिता अनेकांनी फिल्डींग लावली आहे. वर्धा पालिकेत बांधकाम सभापती म्हणून निलेश किटे, आरोग्य सभापती म्हणून मिना भाटीया, स्वच्छता व पाणीपुरवठा सुमित्रा कोपरे, शिक्षण श्रेया देशमुख, महिला बालकल्याण सभापती म्हणून शबीना परविन खान आणि त्यांना सहकारी म्हणून आडे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा जोरात आहे. यापैकी कोणाची वर्णी लागेल हे उद्या होणाऱ्या निवडीनंतरच समोर येणार आहे.
वर्धेसह जिल्ह्यातील देवळी, पुलगाव, हिंगणघाट, सिंदी (रेल्वे) आणि आर्वी पालिकेतही निवडणूक होणार आहे. यात आर्वी येथील पक्षश्रेष्ठी वेळेवरच या सभापतींच्या नावाची घोषणा करणार आहे. देवळी जवळपास नावे पक्की झाली असून ती उद्याच जाहीर होणार आहे. तर हिंगणघाट येथेही वेळेवरच नावे जाहीर होणार असल्याची चर्चा पक्ष कार्यकर्त्यांत आहे.
पुलगाव येथे सत्ता स्थापन्याकरिता भाजपा आणि अपक्षात गठबंधन झाल्याने पाच पैकी दोन पद अपक्षांना देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिंदी (रेल्वे) येथे या पदांकरिता रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र सुरूच असल्याचे दिसून आले. वर्धेत साधारणत: चित्र स्पष्ट असले तरी वेळेपर्यंत यातील नावे बदलण्याची शक्यत आहे.(प्रतिनिधी)
आर्वीत स्वीकृत सदस्यपदी संजय थोरात आणि राहुल गोडबोले
४आर्वी - येथील नगर परिषदेच्या कार्यालयात सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या पत्रानुसार संजय उद्धव थोरात व राहुल रमेश गोडबोले यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली जिल्हाधिकारी यांच्या स्विकृत सदस्यांना मान्यता मिळाल्याबाबत पत्राचे आज नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी वाचन करून नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे, उपाध्यक्ष पल्लवी हेमंत काळे व नगरसेवक हर्षल पांडे, प्रशांत ठाकुर, उषा सोनटक्के, सह अनेक नगरसेव व नगर सेविकांच्या उपस्थित दोन्ही नावांची घोषण केली. मुख्याधिकारी शिंदे यांनी स्विकृत सदस्य यांचे नावाची घोषणा करताच उपस्थित नगरसेवकांनी नवनिर्वाचित स्विकृत सदस्यांचे स्वागत केले.
रात्रीपर्यत बैठकांचे सत्र सुरूच
४सहा पालिकेत होणाऱ्या पाच विषय समितीच्या सभापतीपदी कोणाची निवड करावी याकरिता सहाही ठिकाणी पक्षश्रेठींच्या रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू असल्याचे दिसून आले आहे. यात कोणाचे नाव नक्की झाले याबाबत कोणीच बोलायला तयार नसल्याने अखेर शिक्कामोर्तब झालेली नावे वेळेवरच कळणार आहे.
वर्धेत अभिषेक त्रिवेदी यांची निवड
४वर्धा नगर परिषदेच्या चार स्वीकृत सदस्यांपैकी तिघांची निवड झाली होती. यात अभिषेक त्रिवेदी यांचा अर्ज नामंजूर झाला होता. या अर्जावर आज निर्णय झाल्याने त्यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली आहे. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे व इतर नगरसेवकांची उपस्थिती होती. तर प्रक्रीया पार पाडण्याकरिता पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.