वायगाव गटाच्या निवडणुकीकडे दिग्गजांचे लक्ष

By admin | Published: February 11, 2017 12:53 AM2017-02-11T00:53:34+5:302017-02-11T00:53:34+5:30

जि.प. सर्कलच्या नव्याने झालेल्या रचनेनंतर वायगाव (नि.) गटात सिरसगाव (ध.), आजगाव, वडद, सेलसुरा, पडेगाव,

The attention of veterans on the Vaigaon group election | वायगाव गटाच्या निवडणुकीकडे दिग्गजांचे लक्ष

वायगाव गटाच्या निवडणुकीकडे दिग्गजांचे लक्ष

Next


विनोद घोडे   चिकणी (जा.)

जि.प. सर्कलच्या नव्याने झालेल्या रचनेनंतर वायगाव (नि.) गटात सिरसगाव (ध.), आजगाव, वडद, सेलसुरा, पडेगाव, चिकणी (जा.), धोत्रा (रे.) अशी आठ गावे जोडण्यात आली. यात वायगाव (नि.) आणि पडेगाव असे दोन गण करण्यात आले आहे. या गटातील व गणातील लढती खासदार व आमदारांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पडेगाव गण हा महिला अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. वर्धा पंचायत समितीचे सभापती पद महिला अनुुसचित जातीकरिता राखीव असल्याने सर्व दिग्गजांच्या नजरा या गणाकडे लागल्या आहे. पडेगाव गणाकरिता भाजपकडून रूपाली राहुल येसनकार यांना उमेदवारी देण्यात आली तर कॉँग्रेसने भिमा इंदल नाखले यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवार स्थानिक असून तसेच बसपाकडून लता प्रमोद डोंगरे या रिंगणात आहे. येथे तिहेरी लढतीचे चित्र आहे.

राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला आहे. दोन्ही पक्षांकडून दिग्गज नेते येथे सभा घेत आहे. त्यामुळे येथील लढाई प्रतिष्ठेची असल्याचे बोलले जाते. प्रचार यंत्रणा झपाट्याने कामाला लागली असून प्रत्येक उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली आहे.

वायगाव (नि.) गट हा खुल्या प्रवर्गासाठी असल्याने येथील लढती लक्षवेधी होण्याची चिन्हे आहे. या गटात दिग्गज उमेदवार रिंगणात आहे. अपक्ष उमेदवार किती मत घेतील यावर बरेच काही चित्र अवलंबून आहे. वायगाव गटात अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक असल्याने येथे बहुरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

Web Title: The attention of veterans on the Vaigaon group election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.