चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:14 PM2017-11-12T23:14:54+5:302017-11-12T23:15:05+5:30
तालुक्यातील सर्व गावात चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (श.) : तालुक्यातील सर्व गावात चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उलट-सुटल चर्चेलाही परिसरात उधान आले असून वाढत्या चोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी भाजयुमोच्यावतीने तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत ठाणेदारांनाही देण्यात आली आहे.
तहसील कार्यालयात सदर मागणीचे निवेदन तहसीलदार सीमा गजभिये यांनी तर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विष्णुपंत कराळे यांनी स्विकारले. गावात फेरीवाले किंवा विविध साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणाºयांची चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. रात्रीच्या वेळी चोरांच्या भीतीमुळे अनेक ग्रामस्थ रात्र जागून काढत आहेत. उलट-सुटल अफवा परिसरात वाºयासारख्या पसरत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे. आष्टी शहरात २२ तर तालुक्यात ३५ च्या वर चोºया झाल्या. मात्र, चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना गजानन भोरे, रावसाहेब गोरे, विनोद कौरती, अनिल सिलस्कार, दीपक नेहारे, मोहम्मद अशपाक आदींची उपस्थिती होती.