पीककर्जास टाळाटाळ, अधिकाऱ्याला फासले काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 05:00 AM2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:01:07+5:30

क्षेत्र अधिकारी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नेहमी टाळाटाळ करायचा. शेतकरी कैलास हुलके यांनी क्षेत्र अधिकाऱ्यांना पीककर्जाबाबत विचारणा केली असता त्यांना हकलून लावले. याबाबतची तक्रार कैलास हुलके यांनी ग्रामपंचायतीकडे दिली. त्यानुसार सरपंच नितीन चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्यांनी क्षेत्र अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनाही उद्धट वागणूक दिली.

Avoid crop loans, blackmail the officer | पीककर्जास टाळाटाळ, अधिकाऱ्याला फासले काळे

पीककर्जास टाळाटाळ, अधिकाऱ्याला फासले काळे

Next
ठळक मुद्देअल्लीपूरच्या स्टेट बँक शाखेतील प्रकार : कार्यप्रणालीमुळे सरपंचांसह सदस्य आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी टाळाटाळ करुन उद्धट वागणूक देणाºया स्टेट बँकेच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर सरपंच नितीन चंदनखेडे आणि इतर सदस्यांनी शाई फेकून तोंडाला काळे फासले. या प्रकाराने सोमवारी बँकेत एकच गोंधळ उडला.
क्षेत्र अधिकारी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नेहमी टाळाटाळ करायचा. शेतकरी कैलास हुलके यांनी क्षेत्र अधिकाऱ्यांना पीककर्जाबाबत विचारणा केली असता त्यांना हकलून लावले. याबाबतची तक्रार कैलास हुलके यांनी ग्रामपंचायतीकडे दिली. त्यानुसार सरपंच नितीन चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्यांनी क्षेत्र अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनाही उद्धट वागणूक दिली. त्यामुळे सरपंच नितीन चंदनखेडे, उपसरपंच विजय कवडे, सदस्य सतीश काळे, तंटामुक्त अध्यक्ष धनराज सुपाटे, राहुल वाटखेडे, हारुन अली, सचीन पारसडे, राहुल घुसे, निखील खाडे यांच्या उपस्थितीत सरपंच चंदनखेडे यांनी क्षेत्र अधिकाऱ्याच्या अंगावर शाई फेकून त्यांच्या तोंडाला काळे फासले. क्षेत्र अधिकाऱ्यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला आहे. याबाबत शेतकºयांसह नागरिकांनी नागपूर येथील विभागीय बँक, अग्रणी बँक, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे क्षेत्र अधिकाऱ्याची बदली करण्याबाबत मागणी केली होती. मात्र, त्यांची बदली झाली नाही. यावेळी सरपंच चंदनखेडे यांनी बँक व्यवस्थापक पाटील यांना शेतकऱ्यांशी अरेरावी करणारे क्षेत्र अधिकारी आमच्या गावात नको, असे खडसावून सांगितले.

Web Title: Avoid crop loans, blackmail the officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.