अतिवृष्टीमुळे दोन दिवस पेरणी टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:03 PM2019-07-01T23:03:45+5:302019-07-01T23:04:04+5:30
जून महिन्यात तब्बल २८ दिवस बेपत्ता राहिलेला वरूणराजा सदर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात बऱ्यापैकी वर्धा जिल्ह्यात बरसल्याने शेतजमीनही ओली झाली आहे. सध्यास्थितीत जमिनीत असलेला ओलावा पेरणीसाठी योग्य असला तरी हवामानखात्याकडून उद्या मंगळवार आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने या दोन दिवशी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळावे, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जून महिन्यात तब्बल २८ दिवस बेपत्ता राहिलेला वरूणराजा सदर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात बऱ्यापैकी वर्धा जिल्ह्यात बरसल्याने शेतजमीनही ओली झाली आहे. सध्यास्थितीत जमिनीत असलेला ओलावा पेरणीसाठी योग्य असला तरी हवामानखात्याकडून उद्या मंगळवार आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने या दोन दिवशी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळावे, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
मंगळवार २ आणि बुधवार ३ जुलैला वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी पुढेही दमदार पाऊस येईल, अशी अपेक्षा बाळगुण पेरणीच्या कामाला गती देत आहेत. यंदाच्या वर्षी १ जुलै सकाळपर्यंत वर्धा तालुक्यात ७१.०३ मिमी, सेलू १५८.४२ मिमी, देवळी ९५.६८ मिमी, हिंगणघाट १०७.१२, समुद्रपूर ११६.७१ मिमी, आर्वी ८७.५४, आष्टी ९६.०४ व कारंजा तालुक्यात ११८.१७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात संपूर्ण जून महिन्यात सरासरी ३२१.६३ पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत केवळ सरासरी १०६.३४ पाऊस पडला आहे. असे असले तरी झालेल्या अल्प पावसामुळे संध्या शेतजमिनीत ओलावा असल्याने पेरणीची कामे शेतकरी करू शकतो; पण जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकºयांनीही या दोन दिवसांमध्ये पेरणी करण्याचे टाळावे, असे सांगण्यात येते.
४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर होणार विविध पिकांची लागवड
यंदाच्या खरीब हंगामात एकूण ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. खरीप ज्वारी १ हजार १०० हेक्टर, ६५ हजार हेक्टरवर तूर, ४०० हेक्टरवर मुंग, ७०० हेक्टरवर उडीद, ६७५ हेक्टरवर खरीप भुईमुंग, १ लाख २५ हजार ९२५ हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर कापूस पिकाची लागवड होणार असल्याचाही अंदाज कृषी विभागाला आहे.
आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जमिनीत बºयापैकी ओलावा आहे. शिवाय पेरणी करण्यासाठी जमिनीतील हा ओलावा फायदेदायक ठरणारा आहे. परंतु, हवामानखात्याने मंगळवार व बुधवारी वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन शेतकºयांनीही सदर दोन दिवस पेरणी करण्याचे टाळले पाहिजे.
- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.