आर्वीत ‘नो व्हेईकल डे’तून जागृती

By admin | Published: April 2, 2016 02:39 AM2016-04-02T02:39:51+5:302016-04-02T02:39:51+5:30

शहरातील विविध सामाजिक संघटना व नो व्हेईकल डे कृती समितीच्या पुढाकाराने आणि जनतानगर झाडे परिवाराच्या ...

Awakening from the Arvey 'No Vehicle Day' | आर्वीत ‘नो व्हेईकल डे’तून जागृती

आर्वीत ‘नो व्हेईकल डे’तून जागृती

Next

आर्वी : शहरातील विविध सामाजिक संघटना व नो व्हेईकल डे कृती समितीच्या पुढाकाराने आणि जनतानगर झाडे परिवाराच्या सहकार्याने शहरात शुक्रवारी नो व्हेईकल डे राबवून पर्यावरण जनजागृती करण्यात आली.
रॅलीची सुरूवात सकाळी ८ वाजता डॉ. पावडे हॉस्पिटल येथून करण्यात आली. आर्वी कृती समितीच्यावतीने या रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली सिव्हील लाईन परिसर, गुरूनानक धर्मशाळा, जनतानगर परिसर ते गांधी चौक, शिवाजी चौक, मार्गे पावडे हॉस्पीटल येथे पोहोचून या रॅलीचा समारोप करण्यात आला.
समारोप प्रसंगी डॉ. अरूण पावडे व सामाजिक संघटनेचे रवी मन्शानी यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी लॉयन्स क्लब, रोटरी क्लब, संत निरंकारी मंडळ, राधास्वामी मंडळ, आर्वी तालुका पत्रकार संघाचे प्रा. अभय दर्भे, उदय बाजपेयी, रमेश सोळंकी, शक्ती गोरे, सुरेंद्र डाफ, डॉ. प्रकाश राठी आदींसह अनिल भट, डॉ. विनय देशपांडे, किशोर चोरडिया, रमेश जवंजाळ, प्रताप ठाकूर, नरेंद्र रावत, चंदू पाटणी, देवकिसन भाटी, सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकारी उषा व दीपा ठाकूर आदींसह इतर सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. अनेकांनी यावेळी आपले विचार यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार अभय दर्भे यांनी व्यक्त केले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Awakening from the Arvey 'No Vehicle Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.