सायबर गुन्ह्यांसाठी दिंडीतून जागृती

By admin | Published: January 8, 2017 12:44 AM2017-01-08T00:44:37+5:302017-01-08T00:44:37+5:30

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सध्याचे चतुर रसाईत गुन्हेगार नागरिकांना गंडा घातल आहेत.

Awakening from dandal to cyber crimes | सायबर गुन्ह्यांसाठी दिंडीतून जागृती

सायबर गुन्ह्यांसाठी दिंडीतून जागृती

Next

पोलीस यंत्रणेचा उपक्रम : अधीक्षकांच्या हस्ते जनजागर सुरू
वर्धा : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सध्याचे चतुर रसाईत गुन्हेगार नागरिकांना गंडा घातल आहेत. दिवसेंदिवस आॅनलाईन फसवणूक, खोटी बतावणीकरून नागरिकांना ठगले जात असून सायबर गुन्ह्याचा आलेख वाढ होत आहे. सदर बाब गंभीर असल्याने होणारी नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी वर्धा पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत सायबर सुरक्षा दिंढीचे आयोजन केले आहे. या दिंडीला शनिवारी पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी हिरवी झेंडी दाखविली.
पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजता आयोजित विशेष कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कडू, पोलीस निरीक्षक अचल मलकापूरे, पोलीस शिपाई कुलदीप टांकसाळे, निलेश कट्टोजवार, दिनेश बोथनकर, अनुप कावळे, अक्षय राऊत आदींची उपस्थिती होती. एम. एच. ३२ जे. १५२ या पोलीसी वाहनावर जनजागृतीपर पोस्टर लावण्यात आले आहे. तसेच या फिरत्या पोलीसी वाहनाच्या माध्यमातून आॅनलाईन होणाऱ्या फसवणुकीपासून जनता स्वत:ला कशी बचावू शकते याची माहिती देणार आहे.(शहर प्रतिनिधी)

संगणकीय व तांत्रिक गुन्ह्याबाबत करणार जनजागृतीवाढत्या सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी पोलिसांच्यावतीने विशेष वॅन तयार करण्यात आली आहे.या वॅनवर विविध प्रकारच्या जनजागृतीपर माहितीचे पोस्टर चिकटविण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या दिंडीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संगणकीय व तांत्रिक गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

दिंडीला ५० हजाराच्या फसवणुकीची सलामी
वर्धा- मी बँकेचा अधिकारी बोलत असून आपले एटीएम ब्लॉक झाले आहे, ते सुरळीत करण्यासाठी एटीएमवरील सोळा अंकी नंबर व पिन कोड सांगा अशी बतावणी करून कवडघाट येथील अश्वजीत नानाजी माने याच्या बँक खात्यातून अज्ञात आरोपीने रोकड काढली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून शनिवारी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्वजीत याला अज्ञात व्यक्तीने फोन करून आपण बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. तुमचे एटीएम ब्लॉक झाल्याने ते सुरू करण्यासाठी एटीएम वरील सोळा अंकी नंबर व पिन कोड सांगण्याचे सांगितले. त्यावर अश्वजीतने विश्वास ठेऊन सदर माहिती दिली असता आरोपीने त्याचा वापर करून अश्वजीत याच्या हिंगणघाट येथील बँकखात्यातून ४९ हजार ९९७ रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत नमुद असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर घटनेची अश्वजीत माने यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Awakening from dandal to cyber crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.