जागृती रॅलीतून दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:05 PM2018-02-19T22:05:48+5:302018-02-19T22:06:43+5:30

कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त नगर परिषदेद्वारे स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीला खा. रामदास तडस यांनी झेंडी दाखवून सुरूवात केली. या जागृती रॅलीद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

Awareness Rally gives message of cleanliness | जागृती रॅलीतून दिला स्वच्छतेचा संदेश

जागृती रॅलीतून दिला स्वच्छतेचा संदेश

Next
ठळक मुद्देखासदारांनी दाखविली झेंडी : सुंदर शहरासाठी नागरिकांना सज्ज राहण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमत
वर्धा : कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त नगर परिषदेद्वारे स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीला खा. रामदास तडस यांनी झेंडी दाखवून सुरूवात केली. या जागृती रॅलीद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
स्वच्छ व सुंदर शहर या हेतूने नगर परिषदेच्यावतीने स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ चे औचित्य साधून सोमवारी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत खा. रामदास तडस, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, श्रेया देशमुख, प्रतिभा बुर्ले, सुमित्रा अरविंद कोपरे, पाणी पुरवठा सभापती संदीप त्रिवेदी, माजी नगराध्यक्ष संतोष ठाकूर, सोनल ठाकरे, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न.प. कर्मचारी व लोकप्रतिनिधी तथा विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी सहभागी झाले होते.
रॅलीची सुरूवात सकाळी ८ वाजता शिवरायांच्या पुतळ्यापासून झाली. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या रॅलीने सोशालिस्ट चौक, बजाज चौक, शास्त्री चौक, वंजारी चौक, धंतोली चौक, आर्वी नाका असे मार्गक्रमण केले. समारोप शिवाजी चौकात करण्यात आला. यानंतर न.प. कार्यालयात सभा घेण्यात आली. वर्धेतील विविध संघटना, अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी रॅलीत सहभागी होऊन स्वच्छ वर्धेचा संदेश दिला.
स्वच्छ व सुंदर वर्धेसाठी स्वच्छता सर्वेक्षण २०१८ साठी नागरिकांनीही सहभागी व्हावे. सज्ज राहावे, असे आवाहन खा. तडस, नगराध्यक्ष तराळे, मुख्याधिकारी वाघमळे व नगरसेवकांनी केले. शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे संचालन उत्तम हापसे यांनी केले. रॅलीला किशोर साखरकर, सुधीर फरसोले, अशोक ठाकूर, अनुप अग्रवाल, सतीश जाधव, नंदनवार, विशाल सोमवंशी, चित्रा चाफले, माधुरी चावरे, विपीन, बाळकृष्ण भोयर आदींनी सहकार्य केले.

Web Title: Awareness Rally gives message of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.