बाबूजींनी लोकमतमधून गरिबांचा आवाज बुलंद केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 05:00 AM2021-07-03T05:00:00+5:302021-07-03T05:00:26+5:30

रक्तदान शिबिराची सुरुवात बाबूजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व  दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी सावंगी रुग्णालयातील रक्तपेढीच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिरात स्वप्नील कापसे, सूरज दुरगुडे, गौरव अलोने, प्रशांत चांभारे, देवाशिष कामडी, प्रतीक झाडे, राजेंद्र कापसे, अभिनय खोपडे, विनोद घोडे, संजय कुबडे, पुष्करणी कुबडे, माधुरी कुबडे, समीर साहू, नीलेश शेंडे, गौरव खोपळ व वैशाली ठाकरे आदींनी  रक्तदान करून सहकार्य केले.

Babuji raised the voice of the poor in the referendum | बाबूजींनी लोकमतमधून गरिबांचा आवाज बुलंद केला

बाबूजींनी लोकमतमधून गरिबांचा आवाज बुलंद केला

Next
ठळक मुद्देरामदास तडस यांचे प्रतिपादन : देवळीत रक्तदानाला ज्येष्ठ, महिला, तरुणांचा उत्साहवर्धक प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : स्वातंत्र्यलढ्यातील सहभागासोबतच दिवंगत जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींनी लोकमतच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांना जोपासण्याचे काम केले. शेतकरी, शेतमजूर यांच्यासह गरीब माणसाच्या न्यायहक्कासाठी अविरत लढा देऊन त्यांच्या प्रश्नाला  वाचा फोडली. आजही लोकमतकडून हा वारसा जोमाने पुढे  नेला जात आहे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.  लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महारक्तदान शिबिराच्या उद‌्घाटनप्रसंगी  ते बोलत होते. विदर्भ केसरी  खासदार रामदास तडस स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुचिता मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषदेच्या गट नेत्या शोभा तडस, नप  शिक्षण सभापती नंदू वैद्य, नगरसेविका कल्पना ढोक, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. आशिष लांडे, नप कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन आचार्य व लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे यांची उपस्थिती होती. 
रक्तदान शिबिराची सुरुवात बाबूजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व  दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी सावंगी रुग्णालयातील रक्तपेढीच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिरात स्वप्नील कापसे, सूरज दुरगुडे, गौरव अलोने, प्रशांत चांभारे, देवाशिष कामडी, प्रतीक झाडे, राजेंद्र कापसे, अभिनय खोपडे, विनोद घोडे, संजय कुबडे, पुष्करणी कुबडे, माधुरी कुबडे, समीर साहू, नीलेश शेंडे, गौरव खोपळ व वैशाली ठाकरे आदींनी  रक्तदान करून सहकार्य केले.  याठिकाणी करण्यात आलेले रक्तदान होल ब्लड, प्लेटलेट व प्लाझ्मा अशा तीन गटात विभागून ऐकून अठेचाळीस लोकांना दिले जाणार असल्याचे रक्तपेढीचे प्रमुख डॉ. सुनील चावरे यांनी यावेळी दिली. सावंगी रुग्णालयाचे डॉ. अनमोल तनेजा, डॉ. तन्वी भादवाज, दि अंकिता, डॉ. पंकज, भूषण राऊत, नितेश बुरबुरे, भावना मेश्राम, विजय उगे व नीरज राहटे यांनी रक्तदान केले. प्रास्ताविक तालुका प्रतिनिधी हरिदास ढोक यांनी केले. संचालन व आभार प्रा. पंकज चोरे यांनी केले.  यशस्वीतेसाठी भाजप शहर अध्यक्ष रवी कारवटकर, सागर कपूर, राजेंद्र मसराम, विलास आडे, संजय चव्हाण, संजय कुबडे, माधुरी कुबडे, गणपत कुरवाडे, नीलेश शेंडे, उज्ज्वला धोपटे, दशरथ भुजाडे व सुरेश पचारे यांनी परिश्रम घेतले. 

रक्तदानातून अर्पण केली आदरांजली

वर्धा : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून वर्धा शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित महारक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या शिबिराला वर्धेकरांनी स्वयंस्फूर्त प्रतिसाद देऊन प्रत्यक्ष रक्तदानातून श्रद्धेय बाबूजींना आदरांजली अर्पण केली. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ‘लोकमत’चे वर्धा शाखा व्यवस्थापक उमेश शर्मा, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल येळणे, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगूळ, युवा परिवर्तन की आवाजचे निहाल पांडे, जय हिंद फाऊंडेशनचे विपीन मोघे, सामाजिक कार्यकर्ते अशोक फरताडे, डॉ. चकोर रोकडे  यांची  उपस्थिती होती. रक्तसंकलनासाठी डॉ. सुविधा टमेवार, उज्ज्वला लामसोंगे, प्रीती ढगे, स्नेहल दहाट, किशोर महाजन यांनी सहकार्य केले. या शिबिराला रोहित फाऊंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ मेश्राम, गणेश महाडोळे, तुषार लोखंडे, नीतेश जाधव, संकेत जाधव, रोशन श्रीरामे, नंदकिशोर वानखेडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

Web Title: Babuji raised the voice of the poor in the referendum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.