३० जणांच्या रक्तदानातून बाबूजींना जयंतीदिनी आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:58+5:30

लोकमत परिवार, जयहिंद फाऊंडेशन, मराठा सैनिक वेलफेअर असोसिएशन, प्रहार, युवा सोशल फोरम तसेच युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखडे यांनी बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केले.

Babuji was honored on his birthday by donating blood of 30 people | ३० जणांच्या रक्तदानातून बाबूजींना जयंतीदिनी आदरांजली

३० जणांच्या रक्तदानातून बाबूजींना जयंतीदिनी आदरांजली

Next
ठळक मुद्देशिबिराला वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : माजी सैनिकांसह विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकमतचे संस्थापक तथा जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत परिवार आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात ३० व्यक्तींनी रक्तदान करून बाबूजींना आदरांजली अर्पण केली.
लोकमत परिवार, जयहिंद फाऊंडेशन, मराठा सैनिक वेलफेअर असोसिएशन, प्रहार, युवा सोशल फोरम तसेच युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखडे यांनी बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केले.
याप्रसंगी युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगूळ, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे, युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जय हिंद फाऊंडेशनचे बिपीन मोघे, लोकमतचे वर्धा कार्यालयाचे व्यवस्थापक उमेश शर्मा, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी श्याम उपाध्याय आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून हे शिबिर पार पडले.
रक्त संकलनासाठी सामान्य रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण गावंडे, डॉ. देवर्षी धांडे, उज्ज्वल लामसोंगे, स्नेहल दाहाड, किशोर महाजन यांनी सहकार्य केले.

या रक्तदात्यांनी केले रक्तदान
जिल्हा सामान्य रुग्णालयात पार पडलेल्या शिबिरात अश्विनी इंगोले, मंगेश ढवळे, रमेश किन्हारे, राहुल चांदूरकर, आकाश कुटेमाटे, पंकज माहुरे, अक्षय झामरे, अ‍ॅलन मॅन्युअल, रोशन आखाडे, रोशन घुडे, संदीप कोल्हे, अरुण पाटणकर, श्याम साटोणे, दिनेश मडावी, पीयूष शेंबेकर, पुरुषोत्तम बजाईत, प्रशांत खोडे, कपील बालपांडे, अविनाश खोसे, पंकज घोनमोडे, अमित भोसले, दिनेश देवतळे, आनंद शेंडे, मंगेश देवतळे, प्रशांत गणोरे, सूरज गायकवाड, भूषण येलेकर, मयूर ढाले, नीलेश चातुरकर, स्वप्नील राऊत यांनी रक्तदान केले.

Web Title: Babuji was honored on his birthday by donating blood of 30 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.