सेवाग्रामच्या आश्रमात लागणार बहुगुणी फणस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 11:37 PM2018-07-01T23:37:11+5:302018-07-01T23:38:30+5:30

फणस भारताच्या भूमितील पारंपरिक झाड. फणसाची भाजी केल्या जाते एवढीच त्याची ओळख नसून ते बहूगुणी आहे. फणसापासून विविध खाद्य व पेय बनविले जातात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संदेश देशभर पोहोचावा या उद्देशाने केरळ येथील के.आर. जयन व त्यांच्या पत्नीने सेवाग्राम आश्रमात येत तेथील गांधी विचार जाणून घेतले.

Bahuguna forest in Sevagram's Ashram | सेवाग्रामच्या आश्रमात लागणार बहुगुणी फणस

सेवाग्रामच्या आश्रमात लागणार बहुगुणी फणस

Next
ठळक मुद्देजयन व स्मिता यांनी जाणले गांधी विचार : आश्रम प्रतिष्ठानच्या उत्पन्नात होणार वाढ

दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : फणस भारताच्या भूमितील पारंपरिक झाड. फणसाची भाजी केल्या जाते एवढीच त्याची ओळख नसून ते बहूगुणी आहे. फणसापासून विविध खाद्य व पेय बनविले जातात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संदेश देशभर पोहोचावा या उद्देशाने केरळ येथील के.आर. जयन व त्यांच्या पत्नीने सेवाग्राम आश्रमात येत तेथील गांधी विचार जाणून घेतले. के. आर. जयन हे फणसाच्या विविध प्रजाती विकसित करणारे तज्ज्ञ असून त्यांनी आश्रमाला दिलेल्या फणस रोपटे ठिकठिकाणी लावण्यात येणार आहे. त्यामुळे आश्रमाच्या उपन्नात वाढ होणार आहे.
फणसाच्या झाडांच्या फांद्या व खोड सुद्धा उपयोगाचे असल्याने याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी रोपटे घेऊन केरळ येथील के. आर. जयन व त्यांच्या पत्नी स्मिता या महात्मा गांधी आश्रमात आल्या होत्या. केरळ मध्ये फणसाची मोठ्या प्रमाणात झाडं आहेत. प्रत्येक घरी नारळ, फणस व आंबा ही झाडं दिसून येतात. फणसाची भाजी पुरती ओळख आता पुसल्या जाऊन लोणचे, जाम, जेली, पेय येवढेच नाही तर आतील बियांपासून बिस्किट बनविल्या जातात. याची मागणी व ख्याती देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा आहे. फांद्या व खोडापासून फर्निचर व विविध वाद्य बनविले जातात. फणसाचे झाड आर्थिक फायद्यासह ऊत्तम आरोग्यासाठी महत्वाचे आहे. ते पारंपरिक असून प्राकृतीक असल्याचे यावेळी जयंत यांनी सांगितले. आपण सदर झाडेचे महत्व जाणून स्वत:च्या शेतात बाग व नर्सरी तयार केली आहे. आपण फक्त बियांपासून रोपटे तयार केली. यात सव्विस प्रकारचे झाडे आहेत. वेगवेगळ्या आकाराची व प्रकारची फणस त्याला लागतात. झाडाचे आयुष्य दीडशे वर्षांचे असून मानव, पर्यावरण आणि जीवजंतुना पोषक आणि पुरक आहे. केरळ राज्यात याचा प्रचार व प्रसार सुरू केला. वेळूकरा या गावात सर्वत्र झाडे दिसतात. फणसाचे महत्त्व लक्षात आल्याने सरकारणे पण यात लक्ष घालून प्रोत्साहन देत आहे. रोडच्या दुतर्फा फणस लावण्याचा आग्रह धरल्या जात आहे. महात्मा गांधीजींच्याआश्रमात शंभर झाडे लावण्यात येणार असून पहिल्या फेरीत त्यांनी पन्नास फणसाची रोपटे दिली. जयन व स्मिता यांनी त्रिस्सूर येथील वैद्यकीय महाविद्यालय परिसरात फणसाचे जंगल तयार करून दिले. आणखी काही ठिकाणी त्यांची कामे सुरू आहे. महाराष्ट्रात १३ कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यात फणसालाही स्थान देणे गरजेचे आहे.

फणसाचे महत्त्व आम्ही जाणले. ही झाडे भाजीची गरज भागविण्यासोबत मोठे आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकते. आम्ही घरीच आणि शेतात याची रोपे तयार केली. घरी शेतात झाडे लाऊन आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला. आता याचे फायदे लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रचार व प्रसार सुरू केला आहे. या कामात मला आवड असून आश्रम प्रतिष्ठानचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. येथे गांधी विचारांची माहिती मिळाली.
- स्मिता

फणस झाडाविषयी जयन व स्मिताकडून ऐकले. दोघांचेही काम उल्लेखनीय आहे. आश्रमात या झाडांची लागवड व्हावी आणि शेतीविभागाच्या माध्यमातून याचा फायदा व्हावा असा प्रयत्न आहे. जेवनाच्या गरजे सोबत आर्थिक फायदा आहे. यामुळे लोकांना पण याचे महत्त्व कळावे आणि वळावे हा प्रयत्न आहे.
- टी. आर. एन. प्रभू, अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान सेवाग्राम.

Web Title: Bahuguna forest in Sevagram's Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.