प्रामाणिकतेमुळे मिळाला बैलजोडीचा मालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:50 PM2018-05-16T23:50:10+5:302018-05-16T23:50:10+5:30

सोशल मिडियाचा उपयोग जेवढा विघातक तेवढाच चांगला आणि महत्त्वाचा असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच प्रत्यय खापरी गावात आला. सिमेलगतच्या गावातील बैलजोडी समुद्रपूर तालुक्यातील खापरी गावात भटकत आली.

Bailboat ownership due to honesty | प्रामाणिकतेमुळे मिळाला बैलजोडीचा मालक

प्रामाणिकतेमुळे मिळाला बैलजोडीचा मालक

googlenewsNext
ठळक मुद्देपारडीचे बैल आले होते खापरीत : शेतकऱ्याने सोशल मीडियावर टाकले फोटो

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरा : सोशल मिडियाचा उपयोग जेवढा विघातक तेवढाच चांगला आणि महत्त्वाचा असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच प्रत्यय खापरी गावात आला. सिमेलगतच्या गावातील बैलजोडी समुद्रपूर तालुक्यातील खापरी गावात भटकत आली. सोशल मिडीयामुळे तब्बल चार दिवसांनी सोमवारी मालकाला सदर बैलजोडी प्राप्त झाली.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या पारडी गावातील शेतकरी जुनघरे यांच्या मालकीची बैलजोडी समुद्रपूर तालुक्यातील खापरी गावात शुक्रवारी १० मे रोजी सायंकाळी ७ वाजता आली. येथील शेतकरी संदीप देशमुख यांच्या शेतातील वैरण खाऊ लागली. संदीप यांनी या बैलजोडीला हुसकावण्याचा प्रयत्न केला; पण दोन वेहा हे बैल त्यांच्या गोठ्यावर आले. सदर बैलजोडी अनोळखी असल्याचे संदीप यांच्या लक्षात आले. त्यांनी या बैलांना पाणी पाजून स्वत:च्या गुरांसोबत बांधून वैरण टाकले. सदर बैलांची माहिती बैलजोडी मालकाला मिळावी म्हणून देशमुख यांनी व्हॉट्स अ‍ॅपवर बैलाचा फोटो आणि माहिती टाकली. चार दिवसांपासून ही माहिती वेगवेगळ्या शेतकरी ग्रुपवर फिरत होती. दरम्यान, कोरा येथील रामदास इसनकर यांनी पारडी गावात दूरध्वनीवरून माहिती दिली.
यावेळी बैलजोडी मालक जुनघरे यांना सोशल मिडीयावरील माहिती दिली. सदर शेतकऱ्याने सांगितलेल्या वर्णनावरून बैलजोडी त्यांची असल्याची खात्री झाली. जुनघरे यांनी बैलजोडी चरायला मोकळी रानात सोडली होती. दररोज ती दिवसभर शिवारातून सायंकाळी घरी परत येत होती; पण १० मे पासून बैलजोडी घरी परतली नव्हती. बैलजोडीचा शोध सुरू होता, सांगितले.
आपली बैलजोडी समुद्रपूर तालुक्यातील खापरी गावात पोहोचल्याचे कळताच शेतकरी जुनघरे यांनी खापरी गाव गाठले. संदीप देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी बैलांची ओळख विचारून वर्णनानुसार ओळख पटल्याने जोडी मालकाला बैलजोडी परत केली. शेतकरी संदीप देशमुख यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे खऱ्या मालकाला अखेर त्याची बैलजोडी प्राप्त झाली.
मीडियाचा असाही उपयोग
मोबाईल क्रांतीने सर्वांच्या हातात अ‍ॅन्ड्रॉईड फोन आले आहे. यामुळे सोशल मिडीयाचा वापर घरोघरी तथा ग्रामीण भागात होत असल्याचे दिसते. बैलजोडी त्यांच्या मालकाला प्रदान करण्यासाठी शेतकऱ्यानेही व्हॉटस् अ‍ॅपचा वापर केला.

Web Title: Bailboat ownership due to honesty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.