कारची बैलबंडीला धडक पिता-पुत्रासह बैलजोडी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 08:33 PM2019-05-30T20:33:51+5:302019-05-30T20:34:23+5:30
नजीकच्या निमगाव (सबाने) येथील शेतकरी गोपाल बाबाराव मरघडे यांच्या बैलबंडीला मागाहून येणाऱ्या कारने जबर धडक दिली. यात सालगडी किसना गोधनकर व मुलगा सचिन गोधनकरसह बैलजोडी गंभीर जखमी झाली. यामुळे शेतकºयाचे सव्वा लाखाचे नुकसान झाले. घटनेविषयी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : नजीकच्या निमगाव (सबाने) येथील शेतकरी गोपाल बाबाराव मरघडे यांच्या बैलबंडीला मागाहून येणाऱ्या कारने जबर धडक दिली. यात सालगडी किसना गोधनकर व मुलगा सचिन गोधनकरसह बैलजोडी गंभीर जखमी झाली. यामुळे शेतकºयाचे सव्वा लाखाचे नुकसान झाले. घटनेविषयी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, निमगाव येथील शेतकरी गोपाल मरघडे यांच्या शेतातील भुईमूग (शेंगदाणा) पिकाची काढणी सुरू आहे. निघालेले पीक बैलबंडीच्या सहाय्याने घरी आणण्याचे काम सुरू होते. रात्री ८.३० वाजतादरम्यान रिकामी बैलबंडी घेऊन शेंगदाण्याच्या शेंगा आणण्याकरीता गोधनकर पिता-पुत्र वर्धा-पुलगाव मार्गाने पुलगावच्या दिशेने जात असताना वर्ध्याकडून येणाºया एम.एच ०५ ए.एस ०७२३ कारने बैलबंडीला मागाहून जबर धडक दिली. धडक इतकी जबर होती की, बंडी अक्षरश: तुटली व बैलजोडीसह किसना गोधनकर (५५), सचिन गोधनकर (१३) गंभीर जखमी झालेत.
जखमी पिता-पुत्रांना सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर बैलांवरसुद्धा पशुचिकित्सालयात उपचार केले जात आहेत. या घटनेमुळे गोपाल मरघडे यांना जवळपास सव्वा ते दीड लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. यामुळे शेतकºयावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बैलजोडी व सालगडी जखमी झाल्याने शेती कशी करावी, ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सावंगी पोलीस करीत आहेत.