हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा जपणारे हिंगणीचे बाल गणेश मंडळ

By admin | Published: September 14, 2016 12:43 AM2016-09-14T00:43:47+5:302016-09-14T00:43:47+5:30

हिंगणी येथील कुंभारपूरा, आखाडा वॉर्ड क्रमांक ३ मधील गणेशोत्सव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक ठरत आहे

Bal Ganesh Mandal of Hingani, Hingani chanting the tradition of Hindu-Muslim unity | हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा जपणारे हिंगणीचे बाल गणेश मंडळ

हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा जपणारे हिंगणीचे बाल गणेश मंडळ

Next

११० वर्षांची परंपरा : १९०५ मध्ये झाली स्थापना; गिरड येथील ५० वर्षे जुन्या गणेश मंडळाला एक गाव एक गणपतीचा मान
रितेश वालदे बोरधरण
हिंगणी येथील कुंभारपूरा, आखाडा वॉर्ड क्रमांक ३ मधील गणेशोत्सव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक ठरत आहे. या बाल गणेश मंडळाला ११० वर्षे पूर्ण झाले आहे. शतकोत्तर परंपरा असलेल्या या मंडळाच्यावतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. १९०५ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली.
हिंदू आणि मुस्लीम समाजातील युवकांनी एकत्र येत येथे जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न या मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे. मंडळाचे सर्वच मुस्लीम सदस्य सर्व कार्यक्रमाला हजर राहत असल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला त्यांची असलेली उपस्थिती सर्वांना आकर्षित करणारी ठरत आहे.
हिंगणी येथील हे एकमेव गणेश मंडळ असून एक गाव एक गणपतीची संकल्पना येथे आजतागायत कायम आहे. हिंगणी येथे गत काही वर्षांपूर्वी बाल गोपालांनी एकत्र येवून गणेशाची मूर्ती स्थापन केली. तेव्हापासून कुंभारपूरा आखाडा येथील नारायण बोरसरे यांच्या घराच्या परिसरात गणेशोत्सवासाठी करण्यात आलेली व्यवस्था आखाडा म्हणून ओळखली जाते. याच परिसरात असलेल्या कुंभारपूरा आखाड्याचे लोक वर्गणीतून काही वर्षांपूर्वी काम करण्यात आले.
या मंडळात बाल गोपालांचा मोठा सहभाग असतो. यामुळे या मंडळाला बाल गणेश मंडळ असे नाव अद्यापही कायम आहे. या मंडळाचे अध्यक्ष प्रशांत मुंडे तर उपाध्यक्ष गजानन वझे, शेख शाबीर, दिवाकर मोहर्ले, किशोर धाबर्डे, अमोल मुडे, भारत वझे, सतीश भजभुजे, अनिल मोहिजे, सतीश वाल्दे, शुभम किरडे, भारत किरडे आदींचा समावेश आहे. गणेशोत्सवासाठी कार्यकर्ते व ग्रामस्थ एकत्रित येऊन सामाजिक एकोपा वाढीला लावण्याकरिता कार्यरत आहेत. या मंडळाचा ११० वर्षांपासून उत्साह आजही कायम असल्याचे विविध कार्यक्रमातून दिसत आहे.

मुस्लीम बांधवांचा सहभाग
शेख बशीर, शेख समीर, शेख युनूस, शेख जुबेर, मर्ती स्थापनेपासून विसर्जन होईपर्यंत ते प्रत्येक कार्यक्रमात हजर असतात. यातून हिंदू- मुस्लीम एकता जपली जात असून बाप्पाच्या भक्तीत तेही तल्लीन होतात. विधिवत पुजा व भव्य महाप्रसाद, साधपणाचे स्वरूप देण्यात आले. यंदा गणेशोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Bal Ganesh Mandal of Hingani, Hingani chanting the tradition of Hindu-Muslim unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.