बळीराजांनो..! आता रडायचं नाही तर लढायचं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:03 PM2018-11-26T22:03:54+5:302018-11-26T22:04:23+5:30
अस्मानी - सुलतानी संकटात शेतकरी होरपळत आहे. निसर्गाचा लहरीपणा, शासनाची अनास्था आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्पभाव यामुळे जीवनाची घडी बसविणे कठीण झाले आहे.दिवसेंदिवस वाढत गेलेल्या कर्जाची परतफेड करणे अशक्य असल्याने हतबल झालेला बळीराजा मृत्यूला कवटाळतो.
आनंद इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अस्मानी - सुलतानी संकटात शेतकरी होरपळत आहे. निसर्गाचा लहरीपणा, शासनाची अनास्था आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्पभाव यामुळे जीवनाची घडी बसविणे कठीण झाले आहे.दिवसेंदिवस वाढत गेलेल्या कर्जाची परतफेड करणे अशक्य असल्याने हतबल झालेला बळीराजा मृत्यूला कवटाळतो. घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर विधवा ही रणरागीणी बणून घराचा अख्खा भार तोलते. तिच्या याच संघर्षाची ही गाथा ‘तेरवं’ या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर साकारण्यात आली आहे. यातून ‘बळीराजांनो...!आता रडायच नाही तर लढायचं’ असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषीप्रधान देशातील शेतकरी समाजातील दुर्लक्षीत घटकच म्हणावा लागेल. शासनाच्या उदासिन धोरणामुळे शेतकºयांचा बळी घेतल्या जात आहे. शेतकरी हा स्वाभिमानी असल्याने कर्जाचा वाढता डोंगर सर करण्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागते. संसाराचा गाडा, मुलांचे शिक्षण, मुलींचा विवाह आणि आजारपणावर उपचार या सर्वांची घडी बसवितांना तो हतबल होतो. यातूनच नाईलाजास्तव आत्महत्येचा मार्ग स्विकारावा लागतो. शेतकºयांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत असतांनाही याचे सरकारला सोयरं सुतक नाही. शेतकरी निघून गेल्यानंतर घराबाहेर पाय न ठेवणारी महिलाही कुटूंबाचा सांभाळ करण्यासाठी सर्व दु:ख गिळून खंबीरपणे उभी राहते. तेव्हापासून तिच्या खºया संघर्षाला सुरुवात होते.परिवाराचा सांभाळ, समाजाच्या पडणाºया नजरा या सर्व आघातावर वार करुन पुन्हा आपलं नवी विश्व निर्माण करते. हीच संघर्षगाथा महिलांनी या नाटकातून साकारली.
तेरा पात्रांनीच साकारल ‘तेरवं’
विदर्भातील अध्ययन भारती परिवार आणि अॅग्रो थिएटर, वर्धा या संस्थांच्या मदतीनं हे नाटकं रंगभूमीवर आलं आहे. संवेदनशील आणि सामाजिक भान जोपासणारे लेखक श्याम पेठकर यांनी हे नाटक लिहिले असून याचं दिग्दर्शन नाट्यकर्मी हरीश इथापे यांनी केलं आहे. या नाटकात वर्धा, यवतमाळ, अमरावती या भागातील पाच विधवा आणि त्याच परिवारातील दोन मुलींचा समावेश आहेत. तर या संस्थेतील सहा जणींनी सहाय्यक भूमिका साकारल्या असून एकूण तेरा पात्रांनी काम केलं आहे. या नाटकात लोकगीतांचा वापर केला असून हे संगीत विरेंद्र लाटनकर यांनी दिले आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग चंद्रपुरला झाला असून चांगला प्रतिसादही मिळाला.
जे भोगलं, जे सोसलं ते रंगभूमीवर अवतरलं
या संवेदनशील नाटकात आत्महत्याग्रस्त परिवारातील विधवांनी घरचाकर्ता पुरुष गेल्यानंतर त्यांनी एकाकी जीवनात जे भोगलं, जे सोसलं तेच ‘तेरवं’ या नाटकातून रंगभूमीवर मांडल आहे. त्यासाठी या महिलांना खास नाट्य प्रशिक्षणही देण्यात आलं. वर्ध्यालगतच्या रोठा येथील ‘अॅग्रो थिएटर’ येथे दोन ते अडीच महिने परिश्रम घेतले. यातील महिला कलाकारांनी अक्षत तृतीया, दसरा असो वा दिवाळी; सर्व सण तालीम करीत.
घरचा कर्ता पुरुष निघून गेल्यानंतर महिलेच्या वाट्याला येणाºया संघर्षाचे जाणीव या नाटकातून होते. समाजातील हरवत असलेल्या माणूसकीला जागं करणारं हे नाटक असून शासनाने व समाजाने हे दु:ख समजून घ्यावं.
हरीष इथापे, नाट्य दिग्दर्शक, वर्धा.