बळीराजा आमचे प्रेरणास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:03 PM2017-10-21T23:03:25+5:302017-10-21T23:03:36+5:30

बळीराजा आमचे पे्ररणास्थान आहे. बळीराजाचे राज्य समतेचे मूल्य जोपासणारे व सर्व लोकांना न्याय देणारे होते. आज बळीराजा म्हणजे शेतकरी व श्रमिक वर्ग या देशात पीडित आहे.

Baliaraja is our inspiration | बळीराजा आमचे प्रेरणास्थान

बळीराजा आमचे प्रेरणास्थान

Next
ठळक मुद्देनागेश चौधरी : किसान अधिकार अभियानचा बळीराजा महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बळीराजा आमचे पे्ररणास्थान आहे. बळीराजाचे राज्य समतेचे मूल्य जोपासणारे व सर्व लोकांना न्याय देणारे होते. आज बळीराजा म्हणजे शेतकरी व श्रमिक वर्ग या देशात पीडित आहे. त्याला हे वर्तमान भाजप शासन खोटी आश्वासने देऊन लाडवत आहे. राजा म्हणून भिकाºयासारखे वागवित आहे. तीन पावलाची भूमिदान मागणारा आजचा वामन म्हणजे आजचे हे ‘अच्छे दिन’ देणारे नाटकी लोक! म्हणून आता फुल्यांचा दृष्टीकोण बाळगून शेतकºयांनी आसूड उगारायची गरज आहे, असे मत नागेश चौधरी यांनी व्यक्त केले.
किसान अधिकार अभियानद्वारे बळीराजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाची भूमिका किसान अधिकार अभियानचे प्रेरक अविनाश काकडे यांनी मांडली. ते म्हणाले की, मागील १० वर्षांपासून आम्ही हा बळी महोत्सव घेऊन शेतकरी प्रश्नांवर चर्चा करीत आहोत. शेतकरी प्रश्नांवर काम व स्थानिक पातळीवर प्रशासनातील प्रश्न सोडवित आहोत. नरकासुर, बळीराजा यांना चुकीच्या इतिहासातील मांडणीमुळे बहुजन समाजातील बहुसंख्य लोक आपल्या इतिहासातील महापुरुषांना पायाखाली तुडवण्याचे काम बलीप्रतिपदेला करीत आहेत. ते समजून घेऊन आता ही चुकीची परंपरा भारतीयांनी सोडून द्यायला हवी, असे सांगितले.
बळी महोत्सवातील दुसºया सत्रात शेती प्रश्नांवर खुली चर्चा करण्यात आली. ‘शेतकरी समस्या व त्यावरील उपाय’ या विषयावर झालेल्या चर्चेत किसान अधिकार अभियानचे प्रमुख कार्यकर्ते वारलुजी मिलमिले, जगदीश चरडे, सुरेश बोरकर, प्रकाश पाटील, नितीन झाडे, ज्ञानेश्वर ढगे, गोविंदा पेटकर, प्रा. सिद्धार्थ बुटले, उपासना यांनी विचार मांडले. समारोप प्रसंगी मुख्य पे्ररक काकडे यांनी शेती प्रश्नांची व उपायोजनांची विस्तृत मांडणी केली. बळी महोत्सवाची सुरुवात ज्योतीराव फुले लिखीत ‘बळी राजा संबंधित अखंडाने’ झाली. यानंतर क्रांतीगीत गायन झाले. जालंदरनाथ, प्रकाश कांबळे, सुनील ढाले, गजेंद्र सुरकार, भिमसेन गोटे, भारत कोकावार यांनी सहकार्य केले.
दुसºया दिवशी २० आॅक्टोबरला सकाळी १० वाजता ‘बळी महोत्सव’ कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी किसान अधिकार अभियानचे अध्यक्ष सुदाम पवार, गजेंद्र सुरकार, पद्मा तायडे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला भाऊराव काकडे, सुमंत मानकर, लक्ष्मण झाडे, संतोष चौधरी, जानराव लोणकर, प्रा. जनार्दन देवतळे, सचिन उगले, मारोती गावंडे आदींनी सहकार्य केले.
लक्ष्मीपूजन दिनी आत्मक्लेश आंदोलन
सेवाग्राम - सेवानिवृत्त कर्मचाºयांनी कुटुंबातील सदस्यांसह लक्ष्मीपूजनाचे दिवशी आत्मक्लेश आंदोलन केले. सेवाग्राम आश्रमासमोर सर्व जिल्हा भूविकास बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाºयांचा न्याय्य हक्काच्या मागणीसाठी बेमुदत सत्याग्रह सुरु आहे. १८ आॅक्टोबर रोजी जिल्हा निंबधक अजय कडू आणि १९ आॅक्टोबर रोजी आ.डॉ.पंकज भोयर, नागपूर आप पक्षाचे जगदीश सिंग, नितीन झाडे, अमित बडवाईक, अशोक मेश्राम, देवेंद्र वानखेडे आणि चंद्रपूरचे प्रमोद भोयर आदींनी भेट देऊन चर्चा केली. हा प्रश्न लावून धरण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Baliaraja is our inspiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.