जोलवाडी-देलवाडी रस्त्यावर गिट्टी पडली उघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:08 AM2018-04-29T00:08:50+5:302018-04-29T00:08:50+5:30

निधीचा संदर्भ देत वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे तालुक्यातील महत्त्वाचा असलेला जोलवाडी-देलवाडी रस्ता खड्ड्यात गेला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग या रस्त्याकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे.

The ballast is open on the Jolwadi-Delwadi road | जोलवाडी-देलवाडी रस्त्यावर गिट्टी पडली उघडी

जोलवाडी-देलवाडी रस्त्यावर गिट्टी पडली उघडी

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांना मनस्ताप : जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग झोपेत, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : निधीचा संदर्भ देत वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे तालुक्यातील महत्त्वाचा असलेला जोलवाडी-देलवाडी रस्ता खड्ड्यात गेला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग या रस्त्याकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे. सुमारे तीन फुट खोल खड्ड्यांमधून अधिकाºयांनी येवून गाडी चालवून दाखविण्याचेही आवाहन येथील नागरिकांनी केले आहे. याप्रकरणी सीईओंकडे तक्रार करण्यात आली आहे.
माजी आमदार दादाराव केचे यांचे जन्मगाव अंबिकापूर आहे. त्यांच्या गावाला जाणारा जोलवाडी- देलवाडी -अंबिकापूर रस्ता दिवसभर वर्दळीचा आहे. या रस्त्याचे नूतनीकरण व डांबरीकरण करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची आहे. या विभागाने नुकत्याच चार कोटींच्या निविदा काढल्या, त्यामध्ये या रस्त्याचा समावेश नाही. दरवर्षी निधी कमी आहे. असे कारण पुढे करून बांधकाम विभाग वेळ मारून नेत आहे. काळ्या मातीत तयार झालेला हा रस्ता निर्मितीपासूनच वादग्रस्त आहे. यावरून दिवसभर येजा करताना वाहन चालकांना चांगलीच सर्कस करावी लागते. एखादी गाडी उलटली नाही असा प्रसंग नित्याचाच आहे. दुचाकी पडून अनेकजण जखमी झाले आहेत.
दरवर्षी रस्त्याचे नियोजन करताना या रस्त्याबाबत अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंत्यांना वारंवार सांगूनही पाहू, करू, असे म्हणून वेळ मारून नेत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य त्रिलोकचंद कोहळे यांनी केला आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांना येजा करताना नरक यातना सहन कराव्या लागतात. दुचाकी बंद पडल्यावर दुरूस्तीची सोय नाही. हा परिसर अप्पर वर्धा धरणाचा असल्याने येथे वन्यप्राण्यांचा वावर असून भीतीचे वातावरण आहे. जोलवाडी प्रवाशी निवाºयावर छत नाही, बसायची व्यवस्था नाही पिण्यासाठी पाणी नाही. यामुळे अशा निर्जन रस्त्यावर मोठी घटना घडण्याची शक्यता आहे.
डांबरी रस्ता असल्याच्या केवळ उरल्या खुणा
या रस्त्याचे खडीकरण करून त्याचे कधी डांबरीकरण करण्यात आले होते. त्याला किती वर्षांचा काळ झाला ते सांगणे कठीण आहे. आता या रस्त्यावरील गिट्टी उघडी पडली असून रस्त्यात कुठेतरी डांबरी डांबराचे ठिगळ दिसत आहे. यामुळे हा डांबरी रस्ता होता असे या खुणांवरून दिसून येत असल्याचे नागरिक बोलत आहे.

Web Title: The ballast is open on the Jolwadi-Delwadi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.