केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:50 PM2019-06-17T22:50:31+5:302019-06-17T22:50:46+5:30
तालुक्यातील केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्या आहेत. विहिरींनी तळ गाठल्याने तर काही शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये थेंंब भरही पाणी नसल्याने तसेच जून महिन्याचे १५ दिवस लोटूनही दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढावली आहे. या प्रकारामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.
प्रफुल्ल लुंगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तालुक्यातील केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्या आहेत. विहिरींनी तळ गाठल्याने तर काही शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये थेंंब भरही पाणी नसल्याने तसेच जून महिन्याचे १५ दिवस लोटूनही दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढावली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.
सेलू तालुक्यातील नामशेष होवू पाहणाऱ्या केळीच्या बागांची संख्या पुन्हा वाढीला लागली होती. एवढेच नव्हे तर केळी पिकविण्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले पाच युनिट सेलूत सुरू झाले. कच्ची केळी या राईपनिंग युनिटमध्ये पिकवून विक्रीसाठी मोठ्या बाजारपेठेत पाठविल्या जाते. आतापर्यंत ठिंबक सिंचनावर जागविलेल्या बागा उन्हाने करपल्या आहेत.
विहिरी कोरड्या पडल्या आहे. उभे पीक वाळताना पाहुन शेतकरी हवालदील झाला आहे. हिच परिस्थिती ऊस उत्पादक शेतकºयांवरही ओढावली आहे. एकूणच यंदाच्या दुष्काळाने अनेकांच्या अडचणीत भर टाकली असून नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने भरीव शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.
यंदा पाण्याची भीषण टंचाई आहे. जून महिन्याचे १५ दिवस लोटले तरी दमदार पाऊस झाला नाही. करपलेली काही झाडे दमदार पाऊस आल्यावर हिरवी होण्याची शक्यता असल्याने पावसाची प्रतीक्षा आहे. शेतातील विहिरीही कोरड्या झाल्याने केळीच्या बागा करपल्या आहेत. केळीचा बगीचा तयार करायचा खूप खर्च येतो. त्यामुळे शासनानेही नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी भरीव शासकीय मदत द्यावी.
- पुरूषोत्तम बोबडे, केळी उत्पादक शेतकरी, वडगाव (कला.).