बँक व्यवस्थापकाच्या तोंडाला फासले काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 11:58 PM2018-07-05T23:58:40+5:302018-07-06T00:00:32+5:30

येथील अलाहाबाद बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडून शेतकऱ्यांना अतोनात त्रास होत आहे. शेतकऱ्यांनी वरिष्ठाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा उपयोग होत नसल्याने अखेर गुरूवारी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्या नेतृत्वात बॅकेवर शेतकऱ्यांनी धडक दिली. व शाखा व्यवस्थापकांच्या तोंडाला काळे फासले.

The bank is in the mouth of the manager | बँक व्यवस्थापकाच्या तोंडाला फासले काळे

बँक व्यवस्थापकाच्या तोंडाला फासले काळे

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांसह भाजपा पदाधिकाºयांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
विजयगोपाल : येथील अलाहाबाद बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडून शेतकऱ्यांना अतोनात त्रास होत आहे. शेतकऱ्यांनी वरिष्ठाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा उपयोग होत नसल्याने अखेर गुरूवारी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्या नेतृत्वात बॅकेवर शेतकऱ्यांनी धडक दिली. व शाखा व्यवस्थापकांच्या तोंडाला काळे फासले.
अलाहाबाद बॅकेच्या शाखेत अभिजित वानखेडे हे व्यवस्थापक आहेत. मागील सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देत होते. कर्जमाफी होऊन सुध्दा त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे तुम्हाला नो डयू मिळणार नाही, तुम्हाला कर्ज भरावेच लागणार व कर्ज मंजूर करून देतो पण तुम्हाला एलआयसी किंवा डिपॉझिट करावे लागेल व कर्ज चाळीस हजार मंजूर करायचे व बोजा मात्र दोन लाखाचा उतरवायचा असा प्रकार सुरू होता. सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांनी शाखा व्यवस्थापक यांची जिल्हाधिकारी, अग्रणी बँक अलाहाबाद मुख्य कार्यालय नागपूर यांच्याकडे लेखी तक्रारी केली. तरीही कारवाई झाली नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांची भेट घेतली व बँकेबद्दल तक्रारी त्यांना सांगितल्या. गुरूवारी दुपारी राजेश बकाणे यांच्या नेतृत्वात गजानन राऊत, इंझाळाचे सरपंच पाटील, विजयगोपालच्या सरपंच निलम बिन्नोड, पंचायत समिती सदस्य युवराज खडतकर,स्वप्निल खडसे, संजय बिन्नोड यांच्यासह २५० ते ३०० शेतकरी बँकेवर धडकले. बँक मॅनेजरला जाब विचारला तेव्हा बँक मॅनेजर काहीही बोलण्यास तयार नव्हते. त्यामुळे राग अनावर झाल्याने बकाने यांनी बँक मॅनेजरच्या तोंडाला काळे फासले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले व मॅनेजरनी लगेच शेतकऱ्यांना कर्ज, नो ड्यू देण्यास सुरूवात केली.

Web Title: The bank is in the mouth of the manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.