पालिकेने मांडला लेखा-जोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:01 PM2019-07-17T22:01:16+5:302019-07-17T22:01:38+5:30

मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात वर्धा नगर पालिकेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखा-जोखा ‘दोन वर्ष वर्धा शहराच्या विकासाची’ या पुस्तिकेचे विमोचन राज्याचे वित्त नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पंतप्रधान आवास योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या नगराचे श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी नगर असे नामकरण करण्यात आले.

Bankruptcy Audit Account | पालिकेने मांडला लेखा-जोखा

पालिकेने मांडला लेखा-जोखा

Next
ठळक मुद्देमुनगंटीवार यांच्या हस्ते विमोचन : अटलबिहारी वाजपेयी नगराचे नामकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात वर्धा नगर पालिकेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखा-जोखा ‘दोन वर्ष वर्धा शहराच्या विकासाची’ या पुस्तिकेचे विमोचन राज्याचे वित्त नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पंतप्रधान आवास योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या नगराचे श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी नगर असे नामकरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. यावेळी मंचावर आमदार प्रा. अनिल सोले, आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकुर, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे आदी उपस्थित होते. विशेष वैशिष्ट पुर्ण निधी २०१५-१६ अंतर्गत वर्धा शहरातील खुल्या जागेच्या विकासावर ५ कोटीचा निधी खर्च करण्यात आला. याअंतर्गत क्रिंडागण व बगीच्यामध्ये हरितक्षेत्र विकास करण्याच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले.
पावडे चौक ते दादाजी धुनिवाले मठ नागपूर रोड पर्यंत रस्त्याचे रूंदीकरण व सिमेंटीकरण याच मार्गावर मध्यभागी पोलसह एलएडी लाईटस लावून विद्युतीकरण करण्याचे काम, जिल्हा न्यायालय वर्धा समोरील शासकीय जागेवर हॉकर्स प्लाझाचे बांधकाम अशा एकूण ३० कोटी रूपयाच्या कामाचे लोकार्पण ना. मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले.
या शिवाय शहरातील बजाज चौक ते राठी एजन्सीपर्यंत रस्त्यावरील दुभाजक सौंदर्यीकरण, नगर परिषद प्रशासकीय इमारतीचा दुसरा माळा बांधकाम, कुंपनभिंत, पार्किंग शेड,वाहन शेड लॅन्ड स्पेपिंग, फायर विभाग इलेक्ट्रीकचे काम, विशेष अनुदान अंतर्गत शहरातील १८ खुल्या जागेत व दुभाजक मध्ये हरितपट्टे विकसीत करणे, विविध प्रभागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण, पेव्हमेंट लावणे, व पुलांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत वाहन शेड, जलतरण तलाव व जुने मुख्याधिकारी निवास येथील संरक्षक भिंत व काँक्रीट नाली, रस्त्याचे डांबरीकरण व शौचालयाचे बांधकाम, १४ वा वित्त आयोग घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत इंझापूर येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राकरीता कुंपनभिंत, चेन लिंक, फेन्सिंग व रस्ता बांधकाम अशा अनेक विकास कामांचा प्रारंभ वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Bankruptcy Audit Account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.