खरीप हंगामातील पीककर्ज वाटपात बँकांनी गाठले अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 10:28 PM2021-09-04T22:28:16+5:302021-09-04T22:28:44+5:30

ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावातील बँकेवरच अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधनेही या काळात उपलब्ध न झाल्याने कर्ज प्रकरणे दाखल करण्यातही खोडा निर्माण झाला होता. सेकंड अनलॉकनंतर कर्ज वाटप प्रक्रियेला गती आली आहे. शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ४२४ कोटी ५१ लाखांचे कर्जवाटप झाले असून बँकांनी निम्मे उद्दिष्ट गाठले  आहे.

Banks reach half-century in kharif peak loan disbursement | खरीप हंगामातील पीककर्ज वाटपात बँकांनी गाठले अर्धशतक

खरीप हंगामातील पीककर्ज वाटपात बँकांनी गाठले अर्धशतक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावेळीही करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे खरीप हंगामातील पीककर्ज वितरण  प्रक्रिया मध्यंतरीच्या काळात मंदावली होती. अनलॉकनंतर कर्जवाटपाला गती आली असून ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार ५३४ शेतकऱ्यांना ४२४ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. कर्जवाटपाची ही टक्केवारी ५० टक्के आहे.
जिल्ह्यातील बँकांना  ८५० कोटी रुपये खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. जिल्ह्यात ४ लाख ३३ हजार ८५० हेक्टरवर खरिपातील पिकांची पेरणी करण्यात आली. खरीप हंगाम आता उलटण्याच्या मार्गावर असून १ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाकरिता पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागीलवर्षी तब्बल पाच महिने लॉकडाऊन होते. यावेळीही मार्च महिन्यापासून कोरोनाने कहर केला. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येने अक्षरश: तांडव घातले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कठोर निर्बंध घालण्यात आले होते. 
शासकीय कार्यालयात १५ टक्के उपस्थितीचा नियम लागू करण्यात आला होता. ८ मे पासून १८ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याने या काळात बँकांदेखील बंद होत्या. ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावातील बँकेवरच अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधनेही या काळात उपलब्ध न झाल्याने कर्ज प्रकरणे दाखल करण्यातही खोडा निर्माण झाला होता. सेकंड अनलॉकनंतर कर्ज वाटप प्रक्रियेला गती आली आहे. शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ४२४ कोटी ५१ लाखांचे कर्जवाटप झाले असून बँकांनी निम्मे उद्दिष्ट गाठले  आहे.
 

१ ऑक्टोबरपासून रब्बीचे कर्जवितर
- खरीप हंगामातील पीककर्ज वितरणाने अर्थशतक गाठले आहे.  खरीप हंगाम आता उलटण्याच्या मार्गावर आहे. १ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाकरिता कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने प्रकरणे दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील एकूण खातेदार शेतकरी ३६५३४

मागीलवर्षीपासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यावेळीही हे संकट कायम असल्याने मध्यंतरी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कर्ज वितरणावर परिणाम झाला. अनलॉकनंतर बँकांचे कामकाज पूर्वपदावर आले असून कर्जवाटपालाही गती आली आहे. खरीप हंगामातील कर्जवाटपाचे निम्मे उद्दिष्ट गाठण्यात आले आहे.
-वैभव लहाने, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.

 

Web Title: Banks reach half-century in kharif peak loan disbursement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.