अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 11:50 PM2018-05-05T23:50:00+5:302018-05-05T23:50:00+5:30

पोटच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरी करणाऱ्या नराधम बापास जिल्हा न्यायालयाने मृत्यूपर्यंत जन्मठेप ठोठावली. हा निकाल येथील विशेष सत्र न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांनी शनिवारी दिला.

Bapala Jeevan seepap in the case of torture | अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप

अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप

Next
ठळक मुद्देजिल्हा न्यायालयाचा निर्वाळा : पाच हजार रुपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोटच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरी करणाऱ्या नराधम बापास जिल्हा न्यायालयाने मृत्यूपर्यंत जन्मठेप ठोठावली. हा निकाल येथील विशेष सत्र न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांनी शनिवारी दिला.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पीडिता तिच्या आजीच्या गावाला रहात होती. घटनेच्या पाच सहा दिवसापूर्वी आरोपी हा पीडितास शाळा सुरू होत असल्याच्या कारणाने तिला व तिच्या भावाला घरी घेवून आला. दरम्यान ३० जून २०१६ रोजी रात्री १४ वर्षीय पीडिता ही तिच्या लहान भावासोबत झोपली असता अर्ध्या रात्री नरसधम बापाने तिच्यावर बळजबरी केली.
पीडिता ही १ जुलै २०१६ रोजी शाळेत गेली नाही. दुसऱ्या दिवशी ती शाळेत आल्यावर तिला तिच्या वर्ग शिक्षिका लोहकरे यांनी शाळेत न येण्याच्या कारणाची विचारणा केली. यावर ती काहीही बोलली नाही. शिवाय ती नाराज दिसत होती. शाळा सुटल्यावर पीडिता ही तिच्या वर्ग मैत्रिणीसोबत घरी परत जात असताना शाळेच्या कंपाऊंडमध्ये लोहकरे यांच्या हातात एक चिठ्ठी दिली. त्यामधल्या मजकूर वाचला असता लोहकरे यांना ती बाब अतिशय गंभीर वाटली. त्यांनी त्यांच्या इतर सहकारी शिक्षकांना सदर चिठ्ठी दाखविली व त्यानंतर गावातील सरपंचाकडे जावून त्यांना सोबत घेवून वर्ग शिक्षिकेने पोलीस सेवाग्राम पोलिसात या प्रकाराची तक्रार केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत तपास पूर्ण करून सहायक पोलीस निरीक्षक गजानन वासेकर यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. जी.व्ही. तकवाले यांनी एकूण ११ साक्षदार तपासले व युक्तीवाद केला. त्यात पैरवी अधिकारी एएसआय मारोती कांबळे यांनी साक्षदारांना हजर करून मोलाची कामगिरी बजावली. साक्षपुराव्यावरून विशेष न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांनी सदर आरोपीला शिक्षा ठोठावली.
आई-वडिलांच्या नात्यातील वितुष्टामुळे घटना
या प्रकरणामध्ये पीडिताची आई व वडील यांच्यात बºयाच वर्षांपासून वितुष्ट आले आहे. यामुळे पीडिता कधी तिच्या आईकडे तर कधी वडिलांकडे राहत होती. या प्रकाराचा गैरफायदा घेत आरोपीने सदर कृत्य केले. सदर घटनेची दखल वर्गशिक्षिकेने त्वरीत घेतल्यामुळेच आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल होवू शकला व सर्व साक्षदाराच्या सहकार्यानेच आरोपी सिद्ध होण्यास मदत झाली.

Web Title: Bapala Jeevan seepap in the case of torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा