जामणीच्या पारधी बेड्यावरील दारू भट्टीवर धाड
By Admin | Published: October 1, 2014 11:27 PM2014-10-01T23:27:21+5:302014-10-01T23:27:21+5:30
जिल्हा पोलीस अधिक्षकांचे विशेष पथक व सेलू पोलिसांनी सामूहिकरीत्या जामणी नजीकच्या पारधी बेड्यावर पहाटे ४ वाजता धाड घातली. या कारवाईत १ लाख १५ हजार रुपयांचे साहित्य जप्त करून केले
आकोली : जिल्हा पोलीस अधिक्षकांचे विशेष पथक व सेलू पोलिसांनी सामूहिकरीत्या जामणी नजीकच्या पारधी बेड्यावर पहाटे ४ वाजता धाड घातली. या कारवाईत १ लाख १५ हजार रुपयांचे साहित्य जप्त करून केले तर मोहा सडवा रसायन नष्ट केले. याप्रकरणी दोघांवर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली.
जामणी येथील पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात दारू गाळली जाते. याची माहिती खरांगणा पोलिसांनाही होती. आंजी (मोठी) विभागातील गावांसह सुकळी (बाई), जामणी, आकोली, टाकळी, झडशी आदी गावात पहाटेपासून दारूचा पुरवठा केला जात होता; मात्र यावर कारवाई करण्यात येत नव्हती. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत होता.
या प्रकरणी ठाणेदार संतोष बकाल रजेवरून परत आल्यावर त्यांनी खापरी गावातील दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची कारवाई केली. लगेच दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजतापासून जेसीबीद्वारे जमिनीत गाडून ठेवलेले मोठे ड्रम नष्ट केले. जेसीबी जात नव्हती अशा ठिकाणी टिकास, सब्बल व फावडे हातात घेवून जमिनीत गाडलेले सडवा रसायनाचे ड्रम नष्ट केले.
याप्रकरणी अमीत प्रेमराज काळे (२२) रा. कोटंबा ह.मु. जामणी याचा ८४ हजाराचा मुद्देमाल तर भुऱ्या उर्फ गेंड्या धर्मराज भोसले कडून ३१ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत दारू गाळण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. ही कारवाई ठाणेदा संतोष बकाल, देवेंद्र पवार व एस बी. मुल्ला यांच्यासह जमादार संजय पडोळे, दिनेश पांडे, मनोहर बोरधरे, प्रकाश झाडे, निलिमा उमक यांनी केली.(वार्ताहर)