सेलू येथील बारभाई गणेश मंडळाचे यंदा १२० व्या वर्षांत पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 06:00 AM2019-09-02T06:00:00+5:302019-09-02T06:00:09+5:30

सेलुतील गणपतराव जोशी आणि आबाजी वऱ्हाडपांडे यांनी १८९९ मध्ये लोकमान्य टिळकांना सेलू येथे आणले होते. त्यांच्या हस्ते येथील मारवाडी मोहल्ल्यात गणेशमूर्तीची स्थापना केली होती. त्यावेळी या मंडळात बारा जणांचा सहभाग असल्याने लोकमान्य टिळकांनी या मंडळाचे नामकरण बारभाई गणेश मंडळ असे केले.

BARBHAI GANESH BOARD OF SELU This year marks its 7th year | सेलू येथील बारभाई गणेश मंडळाचे यंदा १२० व्या वर्षांत पदार्पण

सेलू येथील बारभाई गणेश मंडळाचे यंदा १२० व्या वर्षांत पदार्पण

Next
ठळक मुद्देएकोप्याचा देतात संदेश : लोकमान्य टिळकांनी केली होती स्थापना, दहा दिवस राहणार कार्यक्रमांची रेलचेल

प्रफुल्ल लुंगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : गावागावात एकोपा आणि सर्वधर्म समभाव असावा, याकरिता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यांनी स्वत: सेलूला येऊन १८९९ मध्ये सुरु केलेल्या या बारभाई गणेशोत्सवाने १२० व्या वर्षात पदार्पण केले आहे. आजही तेवढ्याच धार्मिकतेने आणि एकोप्याने हा उत्सव अविरत सुरु आहे. या दहा दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन गावात उल्हासपूर्ण वातावरणाची निर्मिती केली जाते.
सेलुतील गणपतराव जोशी आणि आबाजी वऱ्हाडपांडे यांनी १८९९ मध्ये लोकमान्य टिळकांना सेलू येथे आणले होते. त्यांच्या हस्ते येथील मारवाडी मोहल्ल्यात गणेशमूर्तीची स्थापना केली होती. त्यावेळी या मंडळात बारा जणांचा सहभाग असल्याने लोकमान्य टिळकांनी या मंडळाचे नामकरण बारभाई गणेश मंडळ असे केले. या मंडळात त्यावेळी गणपतराव जोशी, आबाजी वऱ्हाडपांडे, रामदेव जाजोदिया, नथमल राठी, रामविलास सराफ, श्रीचंद्रजी बेदमोहता, दीपचंद चौधरी, गजानन उपाध्ये, हिरालाल राठी, बोदरकर महाराज यांचा सहभाग होता. सेलू गावात हे एकमेव गणेश मंडळ असून ‘एक गाव एक गणपती’ म्हणून पोलीस विभाग गौरव करतात. दहाही दिवस येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. दररोज लंगरचीही व्यवस्था केली जाते. सेलुचे मुर्तीकार पुरूषोत्तम वालदे श्रध्दापूर्वक मूर्ती साकारुन मंडळाला देतात. दरवर्षी मूर्तीचा आकार व ठेवण जवळपास सारखीच असते. जुन्या पिढीकडून आता नव्या पिढीकडे हा उत्सव सुरू ठेवण्याची आलेली जबाबदारी सर्वजण गणेशाची कृपा म्हणून श्रध्दा पूर्वक पार पाडत आहे. दरवर्षी गणेशोत्सव मंडळाची निवड केली जाते. यावर्षीच्या मंडळात अध्यक्ष म्हणून नरेंद्र अग्रवाल, उपाध्यक्ष अक्षय बेदमोहता, कोषाध्यक्ष यश दफ्तरी व शैलेंद्र दफ्तरी तर सदस्य म्हणून पवन राठी, सुरेंद्र सराफ, ब्रिजमोहन मिश्रा, त्रिशुल चौधरी, सुरेंद्र भंडारी, प्रशांत बेदमोहता, आशिष लोलीया, संजय सराफ, संजय जोशी, दिलीप सारस्वत, राजेश पंचारिया, अमिन दप्तरी यांची निवड करण्यात आली.
मूर्ती देण्याकरिता असतात स्पर्धा
लोकमान्य टिळकांच्या ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेला सेलुकरांनी चांगलीच साथ दिली आहे. दरवर्षी एकच गणपती बसवून त्यांची मनोभावे पूजाअर्चा करतात. बारभाई गणेश मंडळाला दरवर्षी मूर्ती देणारे दानदाते तयारच असतात. यासाठी दानदात्यांची स्पर्धा लागलेली असते. त्यामुळे पुढील दहा वर्षांच्या मूर्तीचे आतापासूनच बुकींग झाले आहे. यावर्षी यंदा पुनम व महेश चांडक (खामगाव) यांच्याकडून श्रींची मूर्ती देण्यात आली आहे.

Web Title: BARBHAI GANESH BOARD OF SELU This year marks its 7th year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.