बंधाऱ्यांवरील खर्च व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:32 AM2018-12-31T00:32:19+5:302018-12-31T00:35:04+5:30

पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशालाच सध्या हरताळ फासल्याचे बोरनदीवरील बंधाºयांची स्थिती पाहिल्यावर दिसून येते. इतकेच नव्हे, तर नदीवर बंधारे बांधूनही २० वर्षांपासून संबंधितांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणीच अडत नसल्याने बंधाºयांवरील झालेला खर्च व्यर्थ ठरत आहे.

The bargains cost useless | बंधाऱ्यांवरील खर्च व्यर्थ

बंधाऱ्यांवरील खर्च व्यर्थ

Next
ठळक मुद्देबोर नदी : २० वर्षांपासून पाणी अडलेच नाही, लघुसिंचनची उदासिनता

विजय माहुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशालाच सध्या हरताळ फासल्याचे बोरनदीवरील बंधाऱ्यांची स्थिती पाहिल्यावर दिसून येते. इतकेच नव्हे, तर नदीवर बंधारे बांधूनही २० वर्षांपासून संबंधितांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणीच अडत नसल्याने बंधाऱ्यांवरील झालेला खर्च व्यर्थ ठरत आहे.
घोराड गावानजीक बोर नदीवर शासनाने मोठा निधी खर्च करून दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली. परंतु, मागील २० वर्षांपासून त्यात पाणीच अडले नसल्याचे शेतकरी सांगतात. विशेष म्हणजे, बंधाऱ्यांपैकी एका बंधाºयाची मागील चार महिन्यांपूर्वी नाममात्र डागडुजी करण्यात आली. तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांनी पुढाकार घेऊन घोराड परिसरात बोरनदीवर हे बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. सुरूवातीला या बंधाºयांमध्ये काही वर्ष पाणी अडले. त्यामुळे परिसरातील शेतातील विहिरींच्या पाणीपातळीतदेखील लक्षणीय वाढ झाली होती. सद्यस्थितीत त्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. बंधारे सुस्थितीत राहावे याकरिता शेतकºयांची समिती तयार करण्यात आली होती; पण बंधारे बंद करण्यासाठी येणारा महागडा खर्च झेपणारा नसल्याचे वास्तव आहे. असे असले तरी ज्या विभागाकडे देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी आहे, तो विभाग सध्या बघ्याची भूमिकाच घेत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे. विशेष म्हणजे, २० वर्षांपासून हे बंधारे हिवाळ्याच्या सुरूवातीलाच कोरडे होतात. या बंधाऱ्याच्या पाट्या गायब असून हे बंधारे बंद करण्यासाठी नव्याने साहित्यही संबंधित विभागाकडून आले नाही. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले बंधारे शासनातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे निरुपयोगी ठरत असून यात शेतकºयांचे नुकसान होत आहे.

डागडुजी नाममात्र
काही महिन्यांपूर्वी स्मशानभूमीजवळ असलेल्या बंधाऱ्याची डागडुजी करण्यात आली. त्यावेळी बंधाºयात अडीच ते तीने फुटांच्या उंचीपर्यंत पाण्याची पातळी राहील, अशी व्यवस्था करण्यात आली; पण करण्यात आलेली डागडुजी किती काळ टिकेल, हे महत्वाचे आहे.

उद्देशाला फासले जातेय हरताळ
शेतकरी सुजलाम्, सुफलाम् व्हावा या हेतूने तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांनी बोरधरण ते सेलूदरम्यान बोरनदीवर अनेक कोल्हापुरी बंधारे बांधले. यापैकी सेलू येथील एक बंधारा वगळता इतर बंधाऱ्यात पाणीच अडत नसल्याने बंधारे बांधण्याच्या उद्देशालाच खो मिळत आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.

जे मोठे आणि दुर्लक्षित बंधारे आहेत, त्याच्या दुरूस्तीसंदर्भाने शासनाकडे ११ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार होत लवकरच निर्णय होईल.
- एच. पी. गहलोत, कार्यकारी अभियंता, लघुसिंचन, वर्धा.

Web Title: The bargains cost useless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.